Siddhaanth Vir Surryavanshi: अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशीचं निधन; जीममध्ये वर्कआऊट करताना आला हृदयविकाराचा झटका
अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशीनं (Siddhaanth Vir Surryavanshi) वयाच्या 46 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. जीममध्ये वर्कआऊट करताना सिद्धांतला हृदयविकाराचा झटका आला.
Siddhaanth Vir Surryavanshi: अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशीचं (Siddhaanth Vir Surryavanshi) निधन झाला आहे. सिद्धांतनं वयाच्या 46 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. जीममध्ये वर्कआऊट करताना सिद्धांतला हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जवळपास 45 मिनिटे सिद्धांत वीर सूर्यवंशीवर रुग्णालयात उपचार सुरु होते. पण रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
सिद्धांत वीर सूर्यवंशीचा जन्म 15 डिसेंबर 1975 रोजी मुंबईत झाला. त्यानं आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगनं केली होती. सिद्धांतनं कुसुम या मालिकेमधून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. त्यानं कसौटी जिंदगी की, कृष्णा-अर्जुन, जमीन से आसमान तक, क्या दिल में है, गृहस्थी, क्यों रिश्तों में कट्टी- बट्टी आणि जिद्दी दिल या छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये काम केलं होते. सिद्धांत हा फिटनेस फ्रीक होता. तो वर्कआऊट करतानाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत होता.
जय भानुशालीनं शेअर केली पोस्ट
अभिनेता जय भानुशालीनं नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. जय भानुशालीनं सिद्धांत वीर सूर्यवंशीचा फोटो शेअर करुन श्रद्धांजली वाहिली आहे. त्यानं इन्स्टाग्राम स्टोरीला सिद्धांतचा फोटो शेअर करुन लिहिलं, 'फार लवकर सोडून गेला'
सिद्धांतनं 2000 मध्ये ईरा सूर्यवंशीसोबत लग्न केले पण त्यांचा 2015 मध्ये घटस्फोट झाला. त्यानंतर 2017 मध्ये मॉडेल आणि फॅशन कोरिओग्राफर आलीसिया राऊतसोबत लग्नगाठ बांधली.
View this post on Instagram
जिद्दी दिल माने या मालिकेमध्ये परम शेरगिल ही भूमिका सिद्धांत वीर सूर्यवंशीनं साकारली होती.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: