एक्स्प्लोर

एक्झिट पोल 2024

(Source:  Poll of Polls)

राजू श्रीवास्तव यांची प्रकृती अद्याप जैसे थे, 13व्या दिवशीही कॉमेडियन बेशुद्धच!

Raju Srivastava Health Update: सुप्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानंतर त्यांना दिल्लीतील एम्स रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते.

Raju Srivastava Health Update: सुप्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानंतर त्यांना दिल्लीतील एम्स रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून त्यांना अजून शुद्ध आलेलीच नाही. 10 ऑगस्ट रोजी हृदयविकाराच्या झटक्यानंतर त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते, सध्या त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. त्यांना लवकरात लवकर शुद्ध यावी म्हणून देशभरातील चाहते प्रार्थना करत आहेत. राजू श्रीवास्तव अद्याप शुद्धीवर आलेले नाहीत. त्यांच्या मेंदूला आलेली सूज अजूनही कमी झालेली नाही. त्यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांना शुद्धीवर आणण्यासाठी डॉक्टर सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. राजू श्रीवास्तव अजूनही व्हेंटिलेटरवर असून त्यांच्या प्रकृतीत आता काहीशी सुधारणा होत आहे.

राजू श्रीवास्तव 10 ऑगस्टपासून सतत लाईफ सपोर्ट सिस्टीमवर म्हणजेच व्हेंटिलेटरवर आहेत. 13व्या दिवशीही त्यांना शुद्ध आलेली नाही. 58 वर्षीय राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराच्या तीव्र झटका आल्याने एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. यानंतर डॉक्टरांनी अँजिओप्लास्टी करून त्यांचा स्टेंट काढला. एम्समधील कार्डिओलॉजी विभागाचे डॉक्टर नितीश नायक यांच्या देखरेखीखाली डॉक्टरांची टीम त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून आहेत.

ते ही लढाई देखील जिंकतील!

राजू श्रीवास्तव यांची पत्नी शिखा श्रीवास्तव याआधी राजू यांच्या प्रकृतीसंदर्भात माहिती देत म्हणाल्या होत्या की, ’राजूजींची प्रकृती स्थिर आहे. डॉक्टर त्यांचे काम चोखपणे करत आहेत. राजूजी लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी संपूर्ण व्यवस्थापन दिवसरात्र काम करत आहे. आमचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. राजूजी हे लढवय्ये आहेत, ते ही लढाई नक्कीच जिंकतील. ते लढतील आणि तुम्हा सर्वांचे मनोरंजन करण्यासाठी बरे होऊन परत येतील, हे माझे तुम्हा सर्वांना वचन आहे. आम्हाला शुभेच्छा, आशीर्वाद मिळत आहेत आणि बरेच लोक त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत. मी सर्वांना प्रार्थना करत राहण्याचे आवाहन करू इच्छिते’.

नेमकं काय घडलं?

जिममध्ये व्यायाम करत असताना राजू श्रीवास्तव यांची प्रकृती खालावली होती. राजू श्रीवास्तव जिममध्ये कसरत करत होते, तिथे ट्रेडमिलवर धावत असताना त्यांना छातीत दुखू लागले. त्यावेळी त्यांना तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले. तेव्हापासून राजू श्रीवास्तव बेशुद्ध असून, अद्याप त्यांना शुद्ध आलेली नाही. कॉमेडियनची प्रकृती चिंताजनक असून, सध्या ते व्हेंटिलेटरवर आहेत. दरम्यान राजू यांची अँजिओग्राफी देखील करण्यात आली होती. त्यामध्ये त्यांच्या हृदयात 100% ब्लॉकेज असल्याचे आढळले होते. राजू श्रीवास्तव लवकर बरे व्हावेत, यासाठी देशभरातील चाहते प्रार्थना करत आहेत.

संबंधित बातम्या

Raju Srivastav Health Update : सुनील पालने व्हिडीओ शेअर करत दिली राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीची माहिती; म्हणाले...

Raju Srivastava Health Update : 'ते लढवय्ये आहेत, ही लढाई ते नक्कीच जिंकतील'; राजू श्रीवास्तव यांच्या पत्नीनं दिली माहिती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CBSE Exam Datesheet 2025: CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Politics Rada | नेत्यांचे 'राडे' राजकीय संस्कृतीचे 'धिंडवडे' Special ReportBaramati Vidhan Sabha | विधानसभा निवडणुकीसाठी बारामतीत राजकारण आणि भावनांचा खेळ Special ReportDevendra Fadnavis : जेव्हा मतदानाचा टक्का वाढतो तेव्हा भाजपला फायदा होतो:फडणवीस ABP MAJHAMaharashtra Politics Rada | नेत्यांचे 'राडे' राजकीय संस्कृतीचे 'धिंडवडे'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CBSE Exam Datesheet 2025: CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Maharashtra Exit Polls Result 2024 : कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Embed widget