एक्स्प्लोर
चेन्नईत पहाटे चार वाजता काला रिलीज, मुंबईत भर पावसात चाहते थिएटरकडे
मुंबई सकाळी सहाच्या आधीच काला चित्रपटाचा पहिला शो सुरु झाला. तर चेन्नईत पहाटे 4 वा सिनेमाचा पहिला शो ठेवण्यात आला.
मुंबई: सुपरस्टार रजनीकांतचा बहुप्रतीक्षीत काला चित्रपट आज पहाटे प्रदर्शित झाला. हा चित्रपट पाहण्यासाठी भर पावसात रजनीकांतच्या चाहत्यांनी चित्रपटगृहात गर्दी केली.
मुंबई सकाळी सहाच्या आधीच काला चित्रपटाचा पहिला शो सुरु झाला. तर चेन्नईत पहाटे 4 वा सिनेमाचा पहिला शो ठेवण्यात आला.
हा चित्रपट पाहण्यासाठी रजनीकांतच्या चाहत्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. काहींनी रजनीकांतच्या पोस्टरला नेहमीप्रमाणे दुग्धाभिषेक केला, तर काहींनी फटाके फोडून स्वागत केलं.
सिनेमाची निर्मिती धनुषने केली आहे, तर दिग्दर्शनाची धुरा पा. रंजित यांनी सांभाळली आहे. याआधी या सिनेमाचं प्रदर्शन दोनदा लांबणीवर टाकण्यात आलं होतं.
रजनीकांत यांनी ‘काला’ची भूमिका साकारली आहे. काला तिरुनेलवेली (तमीळनाडू) वरुन मुंबईला येतो. मुंबईतील धारावीत येऊन तो पॉवरफूल डॉन बनतो, असं या सिनेमाचं कथानक आहे.
या सिनेमात हुमा कुरेशी, संपथ राज, सयाजी शिंदे यासारखी स्टारकास्ट आहे.
संबंधित बातम्या
VIDEO: रजनी-नाना यांच्या काला सिनेमाचा टीझर
नाना पाटेकर आणि रजनीकांत यांच्या 'काला'चा ट्रेलर रिलीज
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
बातम्या
क्रीडा
महाराष्ट्र
Advertisement