Jailer Box Office Collection : टाळ्या, शिट्ट्या अन् कल्ला... रजनीकांतमुळे गाजतोय 'जेलर'! तीन दिवसांत केली 100 कोटींपेक्षा अधिक कमाई
Rajinikanth Movie : रजनीकांतचा 'जेलर' (Jailer) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.
![Jailer Box Office Collection : टाळ्या, शिट्ट्या अन् कल्ला... रजनीकांतमुळे गाजतोय 'जेलर'! तीन दिवसांत केली 100 कोटींपेक्षा अधिक कमाई Rajinikanth Jailer Movie Box Office Collection day three BOLLYWOOD Rajinikanth Jailer mohanlal movie Jackie Shroff Tamannaah Bhatia Entertainment Jailer Box Office Collection : टाळ्या, शिट्ट्या अन् कल्ला... रजनीकांतमुळे गाजतोय 'जेलर'! तीन दिवसांत केली 100 कोटींपेक्षा अधिक कमाई](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/13/bd5bae27d76fcbcb87adfd331b49232f1691896006617254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Rajinikanth Jailer Movie Box Office Collection : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांनी दोन वर्षांनी 'जेलर' (Jailer) या सिनेमाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं आहे. त्यामुळे चाहत्यांनी त्याचा सिनेमा डोक्यावर घेतला आहे. लाडक्या अण्णाचा सिनेमा पाहण्यासाठी चाहते सिनेमागृहात तुफान गर्दी करत आहेत. त्यामुळे रिलीजच्या तीन दिवसांत 'जेलर' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे.
नेल्सन दिलीपकुमार (Nelson Dilipkumar) दिग्दर्शित 'जेलर' हा सिनेमा देशभरात चर्चेत आहे. देशभरातील बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा धुमाकूळ घालत आहे. भारतासह परदेशातही या सिनेमाची प्रचंड क्रेझ आहे. 'थलायवा' रजनीकांतच्या स्टाइल, डान्स, अॅक्शन, लूक अशा सर्वच गोष्टींनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
'जेलर'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या... (Jailer Box Office Collection Day 3)
'जेलर' या सिनेमाला चाहत्यांसह समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. प्रेक्षकांनी या सिनेमाला पसंती दर्शवली आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवरही या सिनेमाने चांगलीच कमाई केली आहे. सॅकनिल्क एंटरनेटमेंटच्या रिपोर्टनुसार, 'जेलर' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 48 कोटींची कमाई करत सर्वांना आश्चर्यचकित केलं. दुसऱ्या दिवशी 25.75 कोटी आणि तिसऱ्या दिवशी या सिनेमाने 35 कोटींची कमाई केली आहे. एकंदरीतच रिलीजच्या तीन दिवसांत 109.10 कोटींचा टप्पा पार करत हा सिनेमा 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे.
रजनीकांतमुळे गाजतोय 'जेलर'!
रजनीकांतचा 'जेलर' हा सिनेमा 10 ऑगस्ट 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. नेल्सन दिलीपकुमार आणि रजनीकांत यांनी 'जेलर' या सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच एकत्र काम केलं आहे. रजनीकांतसह या सिनेमात मोहनलाल, तमन्ना भाटिया आणि शिव राजकुमार यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. रजनीकांतचा सिनेमा पाहण्यासाठी बेंगळुरू आणि चेन्नईमधील अनेक ऑफिसमध्ये रिलीजच्या दिवशी सुट्टी जाहीर केली होती. तर काही ऑफिसमध्ये सिनेमाची तिकीटं मोफत देण्यात आली होती.
'जेलर' सिनेमात रजनीकांत या नावाची जादू आणि एकूणच त्यांचा दमदार अंदाज चाहत्यांना अनुभवायला मिळत आहे. रजनीकांत यांच्या लूकपासून ते स्टाईलपर्यंत त्यांच्या प्रत्येक गोष्टीचं कौतुक होताना दिसत आहे. ‘जेलर’मध्ये रजनीकांत पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटाचे नाव आधी ‘थलैवर 169’ असे ठेवण्यात आले होते, परंतु निर्मात्यांनी नंतर ‘जेलर’ हे नाव नक्की केले. सिनेमात बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफही महत्त्वाच्या भूमिकेत दिसला आहे.
संबंधित बातम्या
Jailer Box Office Collection : नाद करायचा नाय! रजनीकांतच्या 'जेलर'ने दोन दिवसांत केली 75 कोटींची कमाई
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)