Jailer Box Office Collection : नाद करायचा नाय! रजनीकांतच्या 'जेलर'ने दोन दिवसांत केली 75 कोटींची कमाई
Rajinikanth : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतचा 'जेलर' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.
![Jailer Box Office Collection : नाद करायचा नाय! रजनीकांतच्या 'जेलर'ने दोन दिवसांत केली 75 कोटींची कमाई Rajinikanth Jailer Box Office Collection day two Jailer box office collection Day 2 Rajinikanth film continues rampage poised to surpass Rs 100 crore mark today mohanlal movie Jackie Shroff Rajinikanth Tamannaah Bhatia Jailer Box Office Collection : नाद करायचा नाय! रजनीकांतच्या 'जेलर'ने दोन दिवसांत केली 75 कोटींची कमाई](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/12/ac9d2aad0880b8c13abc9633f7fc30dc1691817135886254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Rajinikanth Jailer Box Office Collection : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतचा (Rajinikanth) मोठा चाहतावर्ग असून आजही चाहत्यांमध्ये त्याच्या सिनेमांची क्रेझ कायम आहे. सध्या त्याचा 'जेलर' (Jailer) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. रिलीजच्या दोन दिवसांत या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई केली आहे.
'जेलर'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या... (Jailer Box Office Collection)
सॅकनिल्क एंटरटेनमेंटच्या रिपोर्टनुसार,'जेलर' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 48 कोटींची कमाई केली आहे. तर दुसऱ्या दिवशी 27 कोटींची कमाई केली आहे. एकंदरीतच रिलीजच्या दोन दिवसांत या सिनेमाने 75.35 कोटींचा गल्ला जमवला आहे. वीकेंडला सिनेमाच्या कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरच हा सिनेमा 100 कोटींचा टप्पा पार करेल.
200 कोटींच्या बजेटमध्ये 'जेलर' या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. या सिनेमात रजनीकांतसह शिव राजकुमार, मिर्ना मेनन, तमन्ना भाटिया, मोहनलाल आणि वसंत रवी हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत झळकत आहेत. या सिनेमातील गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. रिलीजच्या दोन दिवसांत या सिनेमाने कमाईच्या बाबतीत अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत.
रजनीकांतच्या 'जेलर'ने रचला इतिहास
- रजनीकांतचा 'जेलर' हा सिनेमा तामिळनाडूमध्ये सर्वाधिक ओपनिंग मिळवणारा पहिला भारतीय सिनेमा ठरला आहे.
- 'जेलर' सिनेमाला कर्नाटकातही चांगलं ओपनिंग मिळालं आहे.
-'जेलर' केरळमध्येही सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे.
- आंध्र प्रदेशातील 2023 मधील सर्वाधिक ओपनिंग करणारा सिनेमा 'जेलर' ठरला आहे.
- एकंदरीतच साऊथमध्ये 'जेलर' हा सिनेमा पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे.
दक्षिणेकडे रजनीकांतला देवाचा दर्जा देण्यात येतो. त्यामुळे रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच त्याच्या सिनेमाला चाहते तुफान गर्दी करतात. रजनीकांतचा जेलर हा सिनेमा 10 ऑगस्ट 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. तब्बल दोन वर्षांनी रजनीकांतने या सिनेमाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर कमबॅक केलं आहे. 'जेलर' या सिनेमात रजनीकांतने मुथुवेल पांडियनची भूमिका साकारली आहे.
'जेलर' सिनेमाच्या रिलीजच्या दिवशी बंगळूरू आणि चेन्नईसह अनेक ठिकाणी सुट्टी जाहीर करण्यात आली होती. तसेच एक जपानी जोडपे ओसारावरुन चेन्नईला खास 'जेलर' सिनेमा पाहायला आले होते. देशभरातील बॉक्स ऑफिसवर सध्या रजनीकांतच्या 'जेलर'चा बोलबाला आहे. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा किती कमाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
संबंधित बातम्या
Jailer Box office Collection : रजनीकांतच्या 'जेलर'ने पहिल्याच दिवशी केली दणदणीत कमाई; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन....
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)