एक्स्प्लोर
'कबाली'च्या रिलीजनंतर रजनीकांत पहिल्यांदाच चाहत्यांसमोर
नवी दिल्लीः शारीरिक प्रकृतीबद्दल अनेक चर्चा झाल्यानंतर सुपरस्टार रजनीकांत आठवडाभराने परदेशातून भारतात परतला आहे. चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावर रजनीकांतला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. चाहत्यांनी रजनीकांतच्या आगमनाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
बॉक्स ऑफिसवर सध्या रजनीकांतच्या सिनेमाने भारतासह परदेशातही धुमाकूळ घातला आहे. त्यानंतर पहिल्यांदाच रजनीकांत चाहत्यांसमोर आला आहे. रजनीकांत अमेरिकेत सर्जरीसाठी गेला आहे, अशी चर्चा काही दिवसांपासून आहे. मात्र रजनीकांतच्या भावाने ही चर्चा केवळ अफवा असल्याचं स्पष्ट केलं.
रजनीकांत अमेरिकेमध्ये रिग्युलर चेकअपसाठी गेला होता. त्यानंतर तो आठवडाभराने भारतात परतला आहे, असं रजनीकांतचे भाऊ सत्यनारायण राव गायकवाड यांनी सांगितलं. मात्र 'कबाली'च्या मोठ्या यशानंतर चाहत्यांना रजनीकांतला पाहण्याची संधी पहिल्यांदाच मिळाली.
पाहा व्हिडिओः
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
महाराष्ट्र
राजकारण
शिक्षण
Advertisement