Har Har Mahadev: 'हर हर महादेव' बाबत राज ठाकरेंचे मनसेच्या प्रवक्त्यांना महत्त्वाचे आदेश; दिग्दर्शक अभिजित देशपांडे यांची आज पत्रकार परिषद
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) मनसेच्या सर्व प्रवक्त्यांना या चित्रपटाबाबत न बोलण्याचे आदेश दिले आहेत.
Har Har Mahadev: सध्या ‘हर हर महादेव' (Har Har Mahadev) या चित्रपटामध्ये इतिहासाची मोडतोड करण्यात आली आहे, असा आरोप सध्या अनेक नेते करत आहेत. चित्रपटातील काही सीन्सला विरोध दर्शवत आक्रमक झालेले राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad ) थेट ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये चित्रपटगृहात पोहोचले आणि त्यांच्यासह कार्यकर्त्यांनी ठाण्यात हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद केला. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) मनसेच्या सर्व प्रवक्त्यांना या चित्रपटाबाबत न बोलण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाला राष्ट्रवादीकडून जातीय रंग दिला जात असल्यानं काहीच न बोलण्याची भूमिका राज ठाकरे यांनी घेतली आहे.
चित्रपटाकडे चित्रपट म्हणून पाहणं गरजेचं आहे, असं राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे मत आहे. राज ठाकरे यांनी मनसेच्या सर्व प्रवक्त्यांना ‘हर हर महादेव' चित्रपटाबाबत न बोलण्याचे आदेश दिले आहेत.
दिग्दर्शक अभिजित देशपांडे भूमिका मांडणार
हर हर महादेव या चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजित देशपांडे हे आज चित्रपटाबाबत भूमिका मांडणार आहेत. आज 11 वाजता अभिजित देशपांडे हे पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेमध्ये अभिजित देशपांडे कोणती मतं मांडतील, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
संभाजीराजे छत्रपती यांनी केला होता आरोप
'हर हर महादेव चित्रपटामध्ये इतिहासाची मोडतोड करण्यात आली आहे, असा आरोप संभाजीराजे छत्रपती यांनी केला होता. ते म्हणाले होते, 'या चित्रपटात इतिहासाचा विपर्यास करण्यात आला आहे. हे असे चित्रपट आपण लोकांपुढे घेऊन जायचे? सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावानं, आपल्याला आधिकार दिले आहेत, म्हणून आपण चित्रपटात काही पण दाखवाचं? सिनेमॅटिक लिबर्टी असली तरी इतिहासाचा गाभा सोडून कसे काय हे लोक चित्रपटाची निर्मिती करत आहेत?'
'हर हर महादेव' चित्रपटाचा वाद ठाण्यात आणखी वाढणार ? मनसे कडून आज त्याच विवियाना मॉल मध्ये मनसे कडून स्पेशल शो
'हर हर महादेव' चित्रपटात दरम्यान जो काल ठाण्याच्या विवियाना मॉल मध्ये राडा झाला त्यानंतर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून 'हर हर महादेव' चित्रपटाचा मोफत शो ठेवण्यात आला आहे, सायंकाळी सव्वा 6 वाजता हा शो ठेवण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी काल याच ठिकाणी हा शो बंद पाडला होता त्यानंतर मनसे नेते अविनाश जाधव यांनी हा शो परत सुरु केला. आज पुन्हा एकदा त्याच ठिकाणी मनसे हा चित्रपट सर्व प्रेक्षकांसाठी मोफत ठेवणार आहेय काल ज्या प्रेक्षकाला मारहाण झाली त्याच्या कुटुंबाला आज पुन्हा एकदा हा शो पाहण्यासाठी बोलून असल्याची माहिती मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिली आहे.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: