एक्स्प्लोर
निगेटिव्ह प्रतिक्रिया, तरीही सलमानच्या 'रेस 3'ची बक्कळ कमाई
सलमानच्या 'रेस 3' या चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती. चित्रपटात सलमानसोबतच बॉबी देओल, अनिल कपूर, जॅकलीन फर्नांडिस, डेझी शाह मुख्य भूमिका साकारत आहेत
मुंबई : ईद आणि सलमानचा हिट सिनेमा हे गेल्या काही वर्षांपासून एक समीकरणच तयार झाले आहे. त्यातच प्रेक्षकांच्या निगेटिव्ह प्रतिक्रियानंतरही सलमान खानची प्रमुख भूमिका असलेल्या 'रेस 3' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली आहे.
या सिनेमाने पहिल्या दिवशी 29.17 कोटी रुपयांची कमाई केली आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी बक्कळ गल्ला जमवत ओपनिंगला सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे.
सलमानच्या 'रेस 3' या चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती. चित्रपटात सलमानसोबतच बॉबी देओल, अनिल कपूर, जॅकलीन फर्नांडिस, डेझी शाह मुख्य भूमिका साकारत आहेत.
याआधी चित्रपटाचा ट्रेलर पाहून अनेकांनी त्यामधील डायलॉगची सोशल मीडियावर खिल्लीही उडवली होती. अशातच काल ईदच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट रिलीज झाला आणि प्रेक्षकांनी त्याला भरभरुन प्रतिसाद दिला.
बंपर ओपनिंग मिळाली असली तरीही सलमानच्या या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement