एक्स्प्लोर
VIDEO: इम्रान हाश्मीच्या 'राज रिबूट' सिनेमाचा ट्रेलर लाँच

मुंबई: बॉलिवूड अभिनेता इम्रान हाश्मीचा आगामी सिनेमा 'राज रिबूट'चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. 'राज' सिनेमाच्या सीरीजमधील हा चौथा सिनेमा आहे. 'राज' दुसऱ्या आणि तिसऱ्या सिक्वेलमध्ये इम्रान हाश्मी प्रमुख भूमिकेत होता. विक्रम भट्ट दिग्दर्शित या सिनेमामध्ये हॉरर आणि बोल्ड सीनचा भरणा आहे. पण ट्रेलर पाहताना तरी तितकी भीती मात्र वाटत नाही. सिनेमात इश्काचाही तडका देण्यात आला आहे. या सिनेमातही इम्रान प्रमुख भूमिकेत दिसून येणार आहे. तर अभिनेत्री कृति खरबंदा आणि गौरव अरोराही दिसणार आहेत. महेश भट्ट या सिनेमाचे निर्माते असून 16 सप्टेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. VIDEO:
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
निवडणूक
महाराष्ट्र























