"माझा कुत्रादेखील त्याला..."; राज कुमारने घरी आलेल्या रामानंद सागरसोबत केलेलं गैरवर्तन; अन् धर्मेंद्रचं नशीब बदललं
Raaj Kumar : राज कुमारने रामानंद सागर यांच्या चित्रपटाची संहिता वाचल्यानंतर घरातील पाळीव श्वानाला विचारलं होतं की तो या चित्रपटात काम करेल का. त्यावेळी राज कुमार रामानंद सागरला म्हणाला होता,"माझ्या श्वानालाही या चित्रपटात काम करायचं नव्हतं".
Raaj Kumar : बॉलिवूडचे अनेक चित्रपट (Movies) कथानकामुळे नव्हे तर त्यातील कलाकारांमुळे त्यांच्या अभिनयामुळे हिट झाले आहेत. अनेकदा कथानक न आवड्याने एक स्टार त्या चित्रपटाला नकार देतो. पण तेच दुसरा कलाकार मात्र तो चित्रपट सुपरहिट करुन दाखवतो. राज कुमार (Raaj Kumar) यांनी नकार दिलेला चित्रपट करण्यास धर्मेंद्र (Dharmendra) यांनी होकार दिला आणि तो चित्रपट सुपरहिट ठरला. 56 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला सामानंद सागर यांचा 'आँखे' हा चित्रपट चांगलाच गाजला. या चित्रपटासाठी रामानंद यांनी सर्वात आधी राज कुमारला विचारणा केली होती. राज कुमार त्याकाळी आघाडीचा अभिनेता होता. चित्रपटाची संहिता वाचून ज्यापद्धतीने त्यांनी नकार दिला ती पद्धत खूपच वेगळी होती. मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा केला जातो की,राज कुमारने रामानंद सागरला म्हटलं होतं की त्यांचा कुत्राही हा चित्रपट करणार नाही".
पाळीव प्राण्याला विचारलेला प्रश्न
राज कुमारने चित्रपटाची संहिता ऐकल्यानंतर घरातील पाळीव प्राण्याला बोलावलं होतं आणि त्याला विचारलं होतं की,"तू हा चित्रपट करशील का?". राज कुमारचा प्रश्न ऐकल्यानंतर त्याचा कुत्रा इकडे-तिकडे पाहू लागला होता. त्यामुळे राज कुमार रामानंद सागरला म्हणाले होते,"पाहा...माझ्या कुत्र्यालाही हा चित्रपट करायचं नाही..मी तरी कसं करू".
रामानंद सागर झालेले नाराज
राज कुमारच्या या कृत्याने रामानंद सागरला वाईट वाटलं होतं. रामानंद सागर लगेचच आपल्या घरी निघून आले होते. राज कुमारच्या वागणुकीने रामानंद सागरला प्रचंड वाईट वाटलं आणि पुन्हा कधीही त्याच्यासोबत काम न करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. पुढे या चित्रपटासाठी कोणीतरी त्यांना धर्मेंद्रचं नाव सुचवलं. त्यानुसार रामानंदने धर्मेंद्रला विचारणा केली. धर्मेंद्रने लगेचच या चित्रपटासाठी आपला होकार दिला.
धर्मेंद्र ठरला हिट
धर्मेंद्रचा हा चित्रपट 1968 मध्ये प्रदर्शित झाला. त्यावेळी हा चित्रपट सुपरहिट ठरला. राज कुमारने या चित्रपटाच्या संहितेचा अपमान केला होता. पण धर्मेंद्रने हा चित्रपट गाजवला. रामानंद सागरने यांची 1 कोटी बजेटमध्ये या चित्रपटाची निर्मिती केली. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने 6.40 कोटींचा गल्ला जमवला. ऑंखे हा चित्रपट 1968 मध्ये प्रदर्शित झाला होता. धर्मेंद्र, माला सिन्हा, महमूद, कुमकुम, सुजीत कुमार हे कलाकार या चित्रपटात मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटासाठी रामानंद सागर यांना फिल्मफेअरदेखील मिळाला होता.
संबंधित बातम्या