Tarsame Singh Saini : 'प्यार हो गया' आणि 'गल्ला गोरियां' फेम गायक तरसेम सिंह सैनी उर्फ ताज यांचे निधन
Tarsame Singh Saini : ताज हे क्रॉस कल्चरल फ्यूजन म्युझिक साठी प्रसिद्ध होते. त्यांनी अनेक सिनेमांत गाणी गायली आहेत.
Tarsame Singh Saini : 'प्यार हो गया' आणि 'गल्ला गोरियां' फेम गायक तरसेम सिंह सैनी (Tarsame Singh Saini) उर्फ ताज यांचे आज निधन झाले आहे. ताज हे क्रॉस कल्चरल फ्यूजन म्युझिक साठी प्रसिद्ध होते. त्यांनी अनेक सिनेमांत गाणी गायली आहेत. वयाच्या 54 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ताज गेल्या अनेक महिन्यांपासून आजारी होते.
RIP brother @tazstereonation You will truly be missed.💔 #TazStereoNation 🙏 🙏 pic.twitter.com/wZjOzUR3WJ
— Bally Sagoo (@ballysagoomusic) April 30, 2022
मीडिया रिपोर्टनुसार, तरसेम सिंह सैनी यांना हर्निया झाला होता. पण कोरोना महामारीमुळे त्यांची शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली. त्यामुळेच त्यांची प्रकृती खालावली. ताज 'प्यार हो गया', 'गल्ला गोरियां', 'इट्स मॅजिक-इट्स मॅजिक', 'नाचेंगे सारी रात' अशा अनेक लोकप्रिय गाण्यांसाठी ओळखले जातात. ताज यांचे 'ये दाने अपने दौर में' हे गाणं प्रचंड गाजलं होतं.
View this post on Instagram
ताज हे क्रॉस कल्चरल फ्यूजन म्युझिकसाठी प्रसिद्ध होते. अल्बम बनवण्यासोबत त्यांनी 'कोई मिल गया', 'रेस' आणि 'तुम बिन' या सिनेमांमध्ये गाणी गायली आहेत. ताज यांनी जॉन अब्राहमच्या 2019 साली प्रदर्शित झालेल्या 'बाटला हाऊस' या सिनेमात 'गल्ला गोरियां' हे गाणं गायलं होतं. 'गल्ला गोरियां' हेच त्यांचं शेवटचं गाणं ठरलं.
संबंधित बातम्या