Most Awaited Hindi Films Of 2023: 'या' चित्रपटांची प्रेक्षक बघत आहेत उत्सुकतेने वाट; 'मोस्ट अवेटेड हिंदी फिल्म्स' ची यादी जाहीर
'मोस्ट अवेटेड हिंदी फिल्म्स' च्या यादीत पुष्पा 2 (Pshpa 2) हा चित्रपट पहिल्या क्रमांकावर आहे.
Most Awaited Hindi Films Of 2023: 2022 मध्ये अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आले. 2023 मध्ये देखील अनेक धमाकेदार चित्रपट रिलीज होणार आहेत, यामधील काही चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. एका मीडिया कंपनीनं 'मोस्ट अवेटेड हिंदी फिल्म्स'ची यादी जाहीर केली आहे. यामध्ये पहिल्या क्रमांकावर अल्लू अर्जुनचा पुष्पा 2 हा चित्रपट आहे. जाणून घेऊयात संपूर्ण यादी...
पुष्पा 2 (Pshpa 2)
सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) पुष्पा-2 (Pushpa 2) या चित्रपटाची त्याचे चाहते उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटाच्या पहिल्या भागाला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. पुष्पा 2 मध्ये अल्लू अर्जुनसोबतच अभिनेत्री रश्मिका मंदाना देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. काही दिवसांपूर्वी पुष्पाः2 (Pushpa 2) चित्रपटाचा एक खास व्हिडीओ चित्रपटाच्या निर्मात्यांनी शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये पुष्पा तुरुंगातून फरार होऊन जंगलामध्ये गेलेला दिसला. पुष्पाः2 च्या हिंदी व्हर्जनची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
#Pushpa2TheRule Begins!!! pic.twitter.com/FH3ccxGHb8
— Allu Arjun (@alluarjun) April 7, 2023
हेरा फेरी, 3-जवान (Hera Pheri 3, Jawan)
'मोस्ट अवेटेड फिल्म्स' च्या यादीत अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांच्या हेरा फेरी हा चित्रपट आणि शाहरुख खानचा जवान हा चित्रपट दुसऱ्या क्रमांकावर आहे. जवान या चित्रपटात शाहरुखसोबतच नयनतारा आणि विजय सेतुपती हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत.
टायगर 3 (Tiger 3)
अभिनेता सलमान खानच्या टायगर 3 या चित्रपटाची देखील प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटात कतरिना कैफ देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे.
Hum sab apna apna khayal rakhen.. Tiger3 on 2023 Eid… let’s all be there ..Releasing in Hindi, Tamil and Telugu. Celebrate #Tiger3 with #YRF50 only at a big screen near you on 21st April 2023. #KatrinaKaif | #ManeeshSharma | @yrf | #Tiger3 pic.twitter.com/StPMGrZ1v5
— Salman Khan (@BeingSalmanKhan) March 4, 2022
भूल भुलैया 3 (Bhool Bhulaiyaa 3)
अभिनेता कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया 2' हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. हा चित्रपट 2017 मध्ये रिलीज झालेल्या 'भूल भुलैया' चित्रपटाचा सिक्वेल होता. आता भूल भुलैया चित्रपटाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
View this post on Instagram
महत्वाच्या इतर बातम्या :