एक्स्प्लोर

Pushkar Jog: "तर मी दोन लाथा मारल्या असत्या", सर्व्हेत जात विचारल्याने पुष्कर जोग भडकला!

Pushkar Jog: पुष्कर हा सध्या त्याच्या सोशल मीडियावरील (Social Media) पोस्टमुळे चर्चेत आहे. पुष्करनं इन्स्टग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये पुष्करनं एका सर्व्हेबाबत लिहिलं आहे. 

Pushkar Jog:  मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता पुष्कर जोग (Pushkar Jog) हा त्याच्या चित्रपटांमुळे नेहमी चर्चेत असतो. पुष्कर हा सध्या त्याच्या  ‘मुसाफिरा’ (Musafiraa) या चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. या चित्रपटासोबतच पुष्कर हा सध्या त्याच्या सोशल मीडियावरील (Social Media) पोस्टमुळे देखील चर्चेत आहे. पुष्करनं इन्स्टग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये पुष्करनं एका सर्व्हेबाबत लिहिलं आहे. 

पुष्करनं शेअर केली पोस्ट

पुष्करनं इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं, “काल बीएमसीचे काही कर्मचारी माझ्या घरी आले आणि मला सर्व्हे करतोय म्हणून माझी जात विचारत होते. त्या कर्मचारी जर बाई माणूस नसत्या, तर २ लाथा नक्कीच मारल्या असत्या…कृपया करुन मला हा प्रश्न पुन्हा विचारू नका नाहीतर जोग बोलणार नाहीत डायरेक्ट कानाखाली मारतील. #जोगबोलणार”


Pushkar Jog:

पुष्करच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. पुष्कर त्याच्या आगामी चित्रपटांची माहिती सोशल मीडियावर शेअर करत असतो. तसेत तो विविध विषयांवरील पोस्ट देखील सोशल मीडियावर शेअर करतो. पुष्करला इन्स्टाग्रामवर 1 मिलियन एवढे फॉलोवर्स आहेत. त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते.

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री केतकी चितळेनं देखील एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिनं एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये  महानगरपालिकेकडून आलेली एक महिला दिसत आहे.  या व्हिडीओला केतकीनं कॅप्शन दिलं, "या राष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला समान हक्क, समान कायदा, समान नियम व कायदे नाहीत. आज ज्या दिवशी भारत सार्वभौम प्रजासत्ताक झाला, त्या दिवशी महानगरपालिका घरोघरी लोकांना पाठवत आहेत."

कधी रिलीज होणार मुसाफिरा?

पुष्करचा मुसाफिरा  हा चित्रपट 2 फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे. ‘मुसाफिरा’ या चित्रपटात पुष्कर जोग, पूजा सावंत, पुष्कराज चिरपुटकर, स्मृती सिन्हा, दिशा परदेशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता. या ट्रेलरला नेटकऱ्यांची पसंती मिळाली.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Pushkar Suhas Jog (@jogpushkar)

पुष्कर जोगचा बाप माणूस हा चित्रपट गेल्या वर्षी रिलीज झाला होता. तसेच पुष्कर हा जबरदस्त,तुक्या तुकविला नाग्या नाचविला, मिशन पॉसिबल या चित्रपटात पुष्करनं काम केलं आहे.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Musafiraa Trailer Out: पाच मित्रांची गोष्ट मांडणाऱ्या ‘मुसाफिरा’चा ट्रेलर प्रदर्शित; चित्रपट या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

महत्त्वाच्या बातम्या

Tamil Actress Anandi Ajay : विजय थलपतीच्या 'जन नायगन' चित्रपटातून सीन कापला, अभिनेत्री ढसा ढसा रडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाली...
विजय थलपतीच्या 'जन नायगन' चित्रपटातून सीन कापला, अभिनेत्री ढसा ढसा रडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाली...
Bollywood TV Actress Shagufta Ali: 'ब्रेस्ट कॅन्सर हा आजार मी लपवून ठेवला, कारण...'; काम गमावण्याच्या भीतीने अभिनेत्रीने लपवून ठेवला गंभीर आजार, आर्थिक संकटही कोसळलं
'ब्रेस्ट कॅन्सर हा आजार मी लपवून ठेवला, कारण...'; काम गमावण्याच्या भीतीने अभिनेत्रीने लपवून ठेवला गंभीर आजार, आर्थिक संकटही कोसळलं
Pravin Tarde and Aadesh Bandekar: 'आदेशजींच्या घरी राहिलोय...'; वारीत प्रवीण तरडे अन् आदेश बांदेकरांची खास भेट, सांगितला संघर्षाच्या काळातील किस्सा
'आदेशजींच्या घरी राहिलोय...'; वारीत प्रवीण तरडे अन् आदेश बांदेकरांची खास भेट, सांगितला संघर्षाच्या काळातील किस्सा
Aaishvary thackeray in YRF Film: राजकारणापासून दूर, सिनेइंडस्ट्रीत ठेवलं पाऊल; यशराज फिल्म्समध्ये झळकणार बाळासाहेब ठाकरेंचा नातू
राजकारणापासून दूर, सिनेइंडस्ट्रीत ठेवलं पाऊल; यशराज फिल्म्समध्ये झळकणार बाळासाहेब ठाकरेंचा नातू

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Thackeray Brothers Rally : राज-उद्धव स्टेजवर, शिवाजी पार्ककडे येणारे सगळे रस्ते गर्दीने भरले अन् ए. आर. रेहमानचं गाणं लागताच सगळं वातावरण देशभक्तीने भारुन गेलं
राज-उद्धव स्टेजवर, शिवाजी पार्ककडे येणारे सगळे रस्ते गर्दीने भरले अन् ए. आर. रेहमानचं गाणं लागताच सगळं वातावरण देशभक्तीने भारुन गेलं
Maharashtra Live blog updates: मुंबईतील शिवाजी पार्क गर्दीने तुडुंब भरुन गेलं, ठाकरे बंधू तिरंगा मार्चसाठी बाहेर पडले, 'जेन झी'ची तुफान गर्दी
Maharashtra Live blog updates: मुंबईतील शिवाजी पार्क गर्दीने तुडुंब भरुन गेलं, ठाकरे बंधू तिरंगा मार्चसाठी बाहेर पडले, 'जेन झी'ची तुफान गर्दी
PM Modi and Sandeep Deshpande: हिटलर का बेटा झुटलर! मनसेच्या संदीप देशपांडेंचं मोर्चासाठी खास टी-शर्ट, फोटो व्हायरल
हिटलर का बेटा झुटलर! मनसेच्या संदीप देशपांडेंचं मोर्चासाठी खास टी-शर्ट, फोटो व्हायरल
Maharashtra Weather Update:बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय; राज्यभरात पुढील 2 दिवस पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांना हवामान विभागाचे अलर्ट, कुठे काय?
बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय; राज्यभरात पुढील 2 दिवस पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांना हवामान विभागाचे अलर्ट, कुठे काय?
Akola Crime: अकोल्यात शिंदे गटाच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखानेच घातपात केल्याचा आरोप, पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन
अकोल्यात शिंदे गटाच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखानेच घातपात केल्याचा आरोप, पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन
Asaduddin Owaisi : मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
CJP Future Plan : 'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
Delhi Protest : अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
Embed widget