Musafiraa Trailer Out: पाच मित्रांची गोष्ट मांडणाऱ्या ‘मुसाफिरा’चा ट्रेलर प्रदर्शित; चित्रपट या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Musafiraa Trailer Out: ‘मुसाफिरा’ या चित्रपटात पुष्कर जोग, पूजा सावंत, पुष्कराज चिरपुटकर, स्मृती सिन्हा, दिशा परदेशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
Musafiraa Trailer Out: पुष्कर जोग (Pushkar Jog) दिग्दर्शित ‘मुसाफिरा’ (Musafiraa) या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रियुनियनच्या निमित्ताने भेटलेल्या पाच मित्रांच्या दुनियेची सफर या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. आयुष्यात आलेले, येणारे चढउतार या सगळ्यांना सामोरे जाऊन कुठेतरी स्वतःसाठी जगताना ते दिसत आहेत. मैत्री म्हटल की, त्यात प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, भांडण या सगळ्या गोष्टी येतात. या सफरीचा मनमुराद आनंद लुटताना हे पाचही मित्र धमाल करणार आहेत. हा प्रवास त्यांना कुठे घेऊन जाणार? हे प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यानंतर कळणार आहे.
‘मुसाफिरा’ ची स्टार कास्ट (Musafiraa Star Cast)
आनंद पंडित मोशन पिक्चर्स, ऐश मोशन पिक्चर्स यांच्या सहकार्याने, नितीन वैद्य प्रोडक्शन आणि गुझबम्प्स एंटरटेन्मेंट प्रस्तुत ‘मुसाफिरा’ या चित्रपटात पुष्कर जोग, पूजा सावंत, पुष्कराज चिरपुटकर, स्मृती सिन्हा, दिशा परदेशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
कधी रिलीज होणार ‘मुसाफिरा’? (Musafiraa Release Date)
मुसाफिरा चित्रपटातील अभिनेता आणि या चित्रपटाचा दिग्दर्शक पुष्कर जोग म्हणाला, ‘’मुसाफिराच्या माध्यमातून मला प्रेक्षकांसाठी काहीतरी दर्जेदार करायचे होते. लॉकडाऊनच्या काळात सुचलेली माझी ही कथा चित्रपटात मांडण्याचा माझा हा प्रयत्न होता. मैत्रीची नवीन परिभाषा या निमित्ताने अनुभवायला मिळणार आहे. आयुष्यात मैत्री किती महत्वाची हेही ‘मुसाफिरा’च्या माध्यमातून अधोरेखित करण्यात आले आहे. मैत्रीपर भाष्य करणारा हा चित्रपट एक कौटुंबिक चित्रपट आहे.’’ मुसाफिरा हा चित्रपट 2 फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे.
पाहा ट्रेलर:
View this post on Instagram
पुष्करनं सोशल मीडियावर मुसाफिरा या चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. या ट्रेलरला त्यानं कॅप्शन दिलं, "लाईफ मध्ये आपण सगळेच मुसाफिरा असतो.फक्त या प्रवासात आपलं Happy Destination स्वतःलाच ठरवावं लागतं. सादर आहे 'मुसाफिरा' ट्रेलर" या ट्रेलरवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. पुष्कर जोग आणि अनुषा दांडेकर यांचा बाप माणूस हा चित्रपट गेल्या वर्षी रिलीज झाला होता. आता त्याच्या 'मुसाफिरा’ या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: