एक्स्प्लोर
दोन्ही देशातील लग्नाच्या लायसन्ससाठी प्रियांका-निकचे प्रयत्न
प्रियांका आणि निक यावर्षी डिसेंबर महिन्यात लग्न करणार असल्याची शक्यता आहे. दोघांनी ऑगस्ट महिन्यात मुंबईमध्ये साखरपुडा केला होता. यावेळी दोघांच्या कुटुंबीयांसह काही खास मित्र उपस्थित होते.

मुंबई : प्रियांका चोप्रा आणि निक जोनास हे दोघे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. मात्र त्यापूर्वी भारत आणि अमेरिका या दोन्ही देशात लग्नाला कायदेशीर मान्यता मिळवण्यासाठी हे दोघे प्रयत्न करत आहेत. त्यासाठी निक आणि प्रियांकाने कोर्टात अर्ज पण केला आहे. 'द ब्लास्ट'च्या वृत्तानुसार प्रियांका आणि निक नुकतेच कॅलिफोर्निया येथील बेवर्ली हिल्स कोर्टहाऊस येथे गेले होते. तेथे ते रजिस्ट्रेशनसाठी गेले असल्याची माहिती मिळत आहे. प्रियांका आणि निक यावर्षी डिसेंबर महिन्यात लग्न करणार असल्याची शक्यता आहे. दोघांनी ऑगस्ट महिन्यात मुंबईमध्ये साखरपुडा केला होता. यावेळी दोघांच्या कुटुंबीयांसह काही खास मित्र उपस्थित होते. सुत्रांनुसार प्रियांका चोप्रा आणि निक जोनास वर्षअखेरीस राजस्थानमधील जोधपूर येथे शाही थाटात लग्न करणार असल्याचं म्हटंल जात आहे. लग्नाच्या तारखेची घोषणा झाली नसली तरी, 2 डिसेंबरला लग्न करणार असल्याचं कळतंय.
आणखी वाचा























