Priyanka Chopra : प्रियांका चोप्राने शेअर केला मालती मेरीचा पिकनिक फोटो; कूल अंदाजात दिसला निक जोनास
Priyanka Chopra : प्रियांका चोप्राने सोशल मीडियावर मालती मेरी आणि निक जोनाससोबतचा एक गोड फोटो शेअर केला आहे.
Priyanka Chopra Shared Family Unseen Picnic Photo : बॉलिवूड ते हॉलिवूडपर्यंत मजल मारणारी देसी गर्ल प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) सध्या चर्चेत आहे. प्रियांका सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. आता तिने तिची लाडकी लेक मालती मेरी (Malti Marie) आणि निक जोनाससोबतचा (Nick Jonas) एक गोड फोटो शेअर केला आहे.
प्रियांकाने शेअर केला पिकनिक फोटो (Priyanka Chopra Shared Photo)
प्रियांका चोप्राने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती मालती मेरी आणि निक जोनाससोबत दिसत आहे. या फोटोत मालती मेरी खूपच गोड दिसत आहे. प्रियांकाने हा फोटो शेअर करताच चांगलाच व्हायरल झाला आहे. या पिकनिक फोटोने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. चाहत्यांसह सेलिब्रिटींनीदेखील या फोटोवर कमेंट्स केल्या आहेत.
प्रियांका चोप्राने पिकनिक फोटो शेअर करत लिहिलं आहे,"रविवार हा पिकनिकसाठीच असतो". या फोटोमध्ये नीक जोनस कूल अंदाजात दिसत आहे. त्याच्या हातात काहीतरी खेळणं असून तो ते मालतीला दाखवत आहे. तर प्रियांका मालती आणि निककडे पाहताना दिसत आहे. या फोटोवर कमाल कुटुंब, गोड कुटुंब, गोंडस परी अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. तर रविवार हा झोपण्यासाठी असतो, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
View this post on Instagram
प्रियांका चोप्राच्या आगामी प्रोजेक्टबद्दल जाणून घ्या... (Priyanka Chopra Upcoming Project)
प्रियांका चोप्राची 'सिटाडेल' ही सीरिज नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. तिची ही सीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. ही सीरिज प्रेक्षक अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर पाहू शकतात. या सीरिजनंतर आता ती एका बॉलिवूड सिनेमात दिसू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.
प्रियांकाने 2002 साली 'थमिजहन' या तामिळ सिनेमाच्या माध्यमातून मनोरंजनसृष्टीत पाऊल ठेवलं. त्यानंतर 2003 साली 'अंदाज'च्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 'ऐतराज', 'मुझसे शादी करोगी', 'फॅशन', 'डॉन', 'बर्फी', 'बाजीराव मस्तानी', 'मेरी कॉम', 'द व्हाइट टायगर' अशा अनेक बॉलिवूड सिनेमांचा प्रियांका चोप्रा भाग आहे.
संबंधित बातम्या