![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Priyanka Chopra Daughter: प्रियंका चोप्राने शेअर केला तिच्या मुलीचा मॉर्निंग फोटो, पाहा मालतीची क्यूट पोज
Priyanka Chopra: प्रियंका चोप्राने तिची मुलगी मालती मेरीचा एक फोटो शेअर केला आहे, जो कदाचित ती झोपेतून उठल्यावरचा आहे. फोटोमध्ये मालती फुलांच्या डिझाईनच्या नाईट ड्रेसमध्ये खूपच क्यूट दिसत आहे.
![Priyanka Chopra Daughter: प्रियंका चोप्राने शेअर केला तिच्या मुलीचा मॉर्निंग फोटो, पाहा मालतीची क्यूट पोज bollywood news priyanka chopra shared picture of her daughter malti marie chopra jonas cute instagram story Priyanka Chopra Daughter: प्रियंका चोप्राने शेअर केला तिच्या मुलीचा मॉर्निंग फोटो, पाहा मालतीची क्यूट पोज](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/10/07a14405d02bfb2ae386ff82ff86ac791683701613113646_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Priyanka Chopra Daughter Malti Marie Photo: सध्या प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) तिच्या चाहत्यांना तिची मुलगी मालतीचे अपडेट्स देत असते. ती सोशल मीडियावर मालती मेरीची (Malti Marry) झलक पोस्ट करत असते. प्रियांकाने मंगळवारी (9 मे) सकाळी तिच्या मुलीचा एक गोंडस फोटो शेअर केला. कानात झुमके आणि फुलांच्या डिझाईनचा (Floral Design) नाईट ड्रेस घालून बसलेली मालती खरच खूप गोंडस दिसत आहे.
प्रियांका रोज तिच्या मुलीचे फोटो पोस्ट करत असते, पण हे सगळे फोटो केवळ साईड क्लिक असतात. प्रियांका मालतीच्या रोजच्या घडामोडींचे अपडेट्स देत असते, पण दुसरीकडे ती तिला जगापासून लपवत असते. मालती मेरीच्या या सुंदर छायाचित्राला चाहत्यांनी खूप पसंती दिली आहे आणि लोक त्यावर कमेंट (Comment) करून तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
प्रियांकाने इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे फोटो
मालती मेरीचा (Malti Marry) हा फोटो बेडवरचा आहे, जेव्हा ती नुकतीच झोपेतून उठली आणि तेव्हा प्रियांकाने तिचा हा फोटो काढला होता. फ्लोरल डिझाईनच्या नाईट सूटमध्ये मालती खूपच क्यूट दिसत आहे. हा फोटो तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर करत प्रियांकाने 'परफेक्ट मॉर्निंग' असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे.
नुकतेच प्रियांकाने पहिल्यांदाच शेअर केला होता व्हिडीओ (Priyanka Chopra Shared Malti Mary Video)
प्रियांकाने चाहत्यांना पहिल्यांदाच मालतीचा आवाज ऐकवला होता. तिने याआधी कधी मालतीच्या अशाप्रकारचा कोणता व्हिडीओ शेअर केला नव्हता. पाळण्यात झोपलेल्या मालतीने पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले होते, ती जोरजोरात पाय मारताना दिसत होती. प्रियांकाच्या लेकीचा व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस उतरला होता. चाहत्यांसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीदेखील या व्हिडीओवर कमेंट्स केल्या.
प्रियांकाप्रमाणे तिच्या लाडक्या लेकीचादेखील मोठा चाहतावर्ग आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी खेळण्यांसोबत खेळतानाचे मालतीचे फोटो अभिनेत्रीने शेअर केले होते. ज्यामध्ये मालती मेरी (Malti Marry) आई प्रियंकासोबत खेळण्यांच्या दुकानात खेळणी खरेदी करताना दिसली होती. या फोटोंना चाहत्यांनी फार पसंतीही दिली होती.
प्रियांका चोप्राचे आगामी प्रोजेक्ट (Priyanka Chopra Upcoming Project)
अभिनेत्री प्रियांका चोप्राने बॉलिवूडसह हॉलिवूडमध्येदेखील स्वत:ला सिद्ध केलं आहे. 'सिटाडेल' नंतर प्रियांका 'जी ले जरा' (Jee Le Zaraa) या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात ती आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि कतरिना कैफसोबत (Katrina Kaif) स्क्रीन शेअर करताना दिसेल. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल. या सिनेमात बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानची झलकदेखील पाहायला मिळणार असल्याचा अंदाज आहे. फरहान अख्तरने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.
हेही वाचा:
Ulajh : जान्हवी कपूरचा 'उलझ' येणार प्रेक्षकांच्या भेटीला; लवकरच होणार शूटिंगला सुरुवात
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)