Priyanka Chopra : मालतीचा पहिला इस्टर! प्रियंकाने शेअर केले सेलिब्रेशनचे फोटो
Priyanka Chopra : प्रियंका चोप्राची लाडकी लेक मालती मेरीने यावर्षी तिचा पहिला इस्टर साजरा केला आहे.
Priyanka Chopra Easter Sunday : ग्लोबर स्टार प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. तिच्या वैयक्तिक आयुष्यासंबंधित अपडेट्स ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असते. लाडकी लेक मालती मेरी चोप्राचे (Malti Marie Chopra) गोड फोटो ती अनेकदा शेअर करत असते. आता तिच्या लेकीने यावर्षी पहिला इस्टर साजरा केला आहे.
प्रियंकाने मालतीच्या पहिल्या इस्टरचे फोटो केले शेअर (Priyanka Chopra Shared Easter Sunday Photo)
प्रियंकाने सोशल मीडियावर (Social Media) मालतीच्या पहिल्या इस्टर सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये मालती खूपच गोड दिसत आहे. पहिल्या इस्टरसाठी मालतीने खास टी-शर्ट घातला होता. या टी-शर्टवर 'मालती मेरी फर्स्ट इस्टर' असं लिहिलेलं दिसत आहे. प्रियंकाने एक मिरर सेल्फीदेखील शेअर केला आहे. या फोटोमध्ये प्रियंका आणि मालतीने ट्विनिंग केल्याचं दिसत आहे. तर एका फोटोत छोटी मालती बागेतील कुत्र्यासोबत खेळताना दिसत आहे.
View this post on Instagram
प्रियंकाने फोटो शेअर करत चाहत्यांना इस्टर संडेच्या शुभेच्छा दिल्या आहे. तिने लिहिलं आहे,"सर्वांना इस्टर संडेच्या खूप-खूप शुभेच्छा". प्रियंकाने शेअर केलेले मालतीचे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले असून हे फोटो सोशल मीडियावरदेखील व्हायरल होत आहेत.
मालतीचा पहिला भारत दौरा
'देसी गर्ल' प्रियंका पहिल्यांदाच मालतीला घेऊन भारतात (India) आली आहे. निता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्धाटन सोहळ्यात प्रियंकाने पती निक नोनससह हजेरी लावली होती. अभिनेत्री तिच्या आगामी 'सिटाडेल' या वेबसीरिजच्या प्रमोशनसाठी भारतात आली असल्याचं म्हटलं जात आहे. या थरार-नाट्य असणाऱ्या वेबसीरिजमध्ये प्रियंका नादियाच्या भूमिकेत आहे.
भारत दौरादरम्यान प्रियंकाने मालतीसह सिद्धिविनायकाचंदेखील दर्शन घेतलं. प्रियंका भारतात सध्या वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावत असून तिची आई मधु चोप्रा मालतीचा सांभाळ करत आहे. मधु चोप्राने मालतीसोबतचा एक गोड फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. प्रियंकाचा 'जी ले जरा' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात अभिनेत्री आलिया भट्ट आणि कतरिना कैफसोबत झळकणार आहे.
संबंधित बातम्या