एक्स्प्लोर
प्रियंका चोप्रा आणि निक हवाई बेटांवर लग्न करणार?
निक जोनासला समुद्र किनारे आवडत असल्यामुळे प्रियंका चोप्रासोबत तो हवाई बेटावर लग्नबंधनात अडकण्याची चिन्हं आहेत.

मुंबई : अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि अभिनेता निक जोनास अमेरिकेत विवाहबद्ध होणार असल्याचं म्हटलं जात आहे. निकला समुद्र किनारे पसंत असल्यामुळे हवाई बेटावर दोघं लग्नबंधनात अडकण्याची चिन्हं आहेत. निकने 'जुमांजी', हवाई 50 यासारख्या चित्रपटांचं शूटिंग हवाई बेटांवर केलं होतं. त्यामुळे निकच्या विशेष आठवणी या जागेशी निगडीत आहेत. हवाईमध्ये त्याचं फेवरिट रिसॉर्टही आहे. त्यामुळे निक आण प्रियंका वेडिंग डेस्टिनेशन म्हणून हवाईची निवड करण्याची शक्यता आहे. निकच्या मागे हॉलिवूडमधील फोटोग्राफर्सचा ससेमिरा आहेच, त्यात प्रियंका चोप्रा आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्त्व झाल्याने भारतातसोबतच परदेशी चाहतेही तिच्या मागे आहेत. त्यामुळे कोलाहल आणि झगमगाटापासून दूर राहून लग्न करण्याचा दोघांचा मानस आहे. प्रियंका आणि निक यांनी 18 ऑगस्ट रोजी भारतीय पद्धतीने रोका (साखरपुडा) केला, त्यामुळे ते भारतीय पद्धतीने लग्न करणार की चर्चमध्ये सात जन्माची एकत्र राहण्याची शपथ घेणार (की दोन्ही?) याबाबत चाहत्यांच्या मनात उत्सुकता आहे. दोघांच्या लग्नाची तारीखही अद्याप निश्चित झालेली नाही. निक आणि प्रियंका यांच्या लग्नाला रॉयल दाम्पत्य हजेरी लावण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इंग्लंडचे प्रिन्स हॅरी आणि डचेस मेगन मार्कल उपस्थित राहण्याचे संकेत आहेत. 'टेकन... विथ ऑल माय हार्ट अँड सोल' अशा मोजक्या शब्दात प्रियंकाने आपण एंगेज्ड झाल्याचं इन्स्टाग्रामवरुन जाहीर केलं होतं. स्क्वेअर कट डायमंड जडवलेली अंदाजे 2.1 कोटी किमतीची अंगठी निकने प्रियंकाला दिली. 26 वर्षांचा निक जोनस अमेरिकन गायक, गीतकार आणि अभिनेता आहे. प्रियंका निकपेक्षा दहा वर्षांनी मोठी आहे. प्रियंकाने भूमिका केलेल्या 'काँटिको' मालिकेतील तिचा सहकलाकार ग्रॅहम रॉजर्सने दोघांची ओळख करुन दिली होती. संबंधित बातम्या : निकने प्रियंकाला दिलेल्या अंगठीची किंमत... निक बर्थडेलाच प्रियंकासोबत लगीनगाठ बांधणार? प्रियंका चोप्रा-निक जोनस यांचा जुलैमध्ये साखरपुडा? निकसोबत लग्नासाठी प्रियांका चोप्राने 'भारत' सोडला?
आणखी वाचा























