एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
निकने प्रियंकाला दिलेल्या अंगठीची किंमत...
अमेरिकन गायक निक जोनासने अभिनेत्री प्रियंका चोप्राला दिलेल्या अंगठीची किंमत सुमारे 2.1 कोटी रुपये असल्याची माहिती आहे.
मुंबई : अभिनेत्री प्रियंका चोप्राने अनेक महिने सर्वांपासून लपवून ठेवलेल्या नात्याची कबुली अखेर दिली. अमेरिकन गायक निक जोनाससोबत प्रियंकाने मुंबईत साखरपुडा केला. निकने प्रियंकाला दिलेल्या अंगठीची किंमत ऐकून तुम्ही अवाक व्हाल. या अंगठीची किंमत सुमारे 2.1 कोटी रुपये आहे.
स्क्वेअर कट डायमंड जडवलेल्या या अंगठीचं डिझाईन टाईमलेस असल्याचं अमेरिकेतील जेमोलॉजिस्ट सांगतात. या अंगठीची किंमत अंदाजे तीन लाख डॉलर म्हणजेच दोन कोटी दहा लाखांच्या घरात असल्याचं म्हटलं जातं. ही एंगेजमेंट रिंग विकत घेण्यासाठी निकने अख्खं दुकान बंद केल्याच्या चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरु होत्या.
'टेकन... विथ ऑल माय हार्ट अँड सोल' अशा मोजक्या शब्दात प्रियंकाने आपण एंगेज्ड झाल्याचं इन्स्टाग्रामवरुन जाहीर केलं. अनेक दिवसांपासून लपवत आलेली अंगठी या सोहळ्यात निकने मानाने प्रियंकाच्या अनामिकेत घातली. मात्र दोघं लग्न कधी करणार, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
25 वर्षांचा निक जोनस अमेरिकन गायक, गीतकार आणि अभिनेता आहे. प्रियंका निकपेक्षा दहा वर्षांनी मोठी आहे. प्रियंकाने भूमिका केलेल्या 'काँटिको' मालिकेतील तिचा सहकलाकार ग्रॅहम रॉजर्सने दोघांची ओळख करुन दिली होती.
प्रियंकाच्या एंगेजमेंट रिंगची किंमत दोन कोटींच्या वर असली, तरी सर्वात महागड्या एंगेजमेंट रिंग घालणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्रींच्या यादीत प्रियंका पहिली नाही, तर तिसरी आहे. अभिनेत्री असिनच्या बोटात तब्बल सहा कोटींची अंगठी आहे.
बिझनेसमन राहुल शर्माने असिनला 2016 मध्ये प्रपोज केलं होतं. 20 कॅरट सॉलिटेअरच्या या अंगठीची किंमत 6 कोटी असल्याची माहिती आहे. हिऱ्याच्या खाली असिन आणि राहुल यांची आद्याक्षरं आहेत.
बिझनेसमन राज कुंद्राने शिल्पा शेट्टीला दिलेल्या अंगठीची किंमत 3 कोटी रुपये आहे. त्यानंतर आता प्रियंकाचा क्रमांक लागतो.
त्यानंतर अनुष्का शर्मा (एक कोटी), सोनम कपूर अहुजा (90 लाख), करिना कपूर खान (75 लाख) ऐश्वर्या राय बच्चन (50 लाख) असा क्रम लागतो.
संबंधित बातम्या :
निक बर्थडेलाच प्रियंकासोबत लगीनगाठ बांधणार?
प्रियंका चोप्रा-निक जोनस यांचा जुलैमध्ये साखरपुडा?
निकसोबत लग्नासाठी प्रियांका चोप्राने 'भारत' सोडला?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जॅाब माझा
राजकारण
करमणूक
राजकारण
Advertisement