एक्स्प्लोर
आधी डोळे, आता गन शॉट, प्रिया वॉरियरचा नवा व्हिडीओ
प्रियाच्या डोळांनी नेटिझन्सला अक्षरशः वेड लावलेला व्हिडीओ ताजा असतानाच आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे.
मुंबई : व्हॅलेंटाईन्स डे अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे आणि बहुतांश सिंगल तरुणांना त्यांची लेटेस्ट क्रश सापडली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओत डोळा मारणारी ही तरुणी देशभरातील लाखो तरुणांच्या हृदयाची धडकन झाली आहे. 'ओरु अदार लव्ह' या मल्ल्याळम चित्रपटातून पदार्पण करणारी ही नवोदित अभिनेत्री आहे प्रिया प्रकाश वॉरियर.
प्रियाच्या डोळांनी नेटिझन्सला अक्षरशः वेड लावलेला व्हिडीओ ताजा असतानाच आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत तिने गन शॉटने नेटिझन्सचं हृदय जखमी केलं आहे. हा व्हिडीओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.
प्रिया वॉरियर कोण आहे?
प्रिया अवघी 18 वर्षांची आहे. केरळातील थ्रिसूरमधल्या विमला कॉलेजमध्ये ती बीकॉमचं शिक्षण घेत आहे.
ओमर लुलू यांच्या 'ओरु अदार लव्ह' या मल्ल्याळम चित्रपटातून प्रिया पदार्पण करत आहे. 'मणिक्या मलराया पूवी' हे गाणं रिलीज करण्यात आलं. व्हायरल झालेली क्लीप ही त्याच गाण्याचा एक भाग आहे. हे गाणं शान रहमानने संगीतबद्ध केलं असून विनीथ श्रीनिवासनने गायलं आहे.
प्रिया फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर अॅक्टिव्ह आहे. इन्स्टा पेजवर तिचे डान्स, मॉडेलिंग आणि अभिनयाच्या कारकीर्दीतील फोटो पाहायला मिळत आहेत. पहिला सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच तिला दुसरं प्रोजेक्टही मिळालं आहे.
प्रियाचा व्हिडिओ व्हायरल होण्यावर प्रकरण थांबलं नाही, तर तिचे मीम्स, ट्रोल्सही झाले. 'आई, सूनबाई मिळाली', हीच माझी व्हॅलेंटाईन, शी इज माय लेटेस्ट क्रश अशा प्रतिक्रिया काहींनी दिल्या, तर काही जणांना याचं काहीच कौतुक वाटत नाही. मात्र काहीही असो, आपल्या अदांनी प्रियाने दखल घ्यायला भाग पाडलं आहे.
पाहा व्हिडीओ :
संबंधित बातम्या :
'नॅशनल क्रश' प्रिया वॉरियरचा व्हॅलेंटाईन प्लॅन काय? जाणून घ्या
प्रिया वारियरने कतरीनासह सनी लिओनलाही मागे टाकलं!
डोळा मारणारी 'व्हायरल गर्ल' प्रिया आहे तरी कोण?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
राजकारण
राजकारण
क्राईम
Advertisement