Prarthana Behere : अभिनेत्री प्रार्थना बेहेरेकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख, शिवभक्तांच्या नाराजीनंतर मागितली माफी
Prarthana Behere : अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने लातूर येथील एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केला आहे. त्यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.
Prarthana Behere : राज्यभरात आज शिवजयंतीचा (Shiv Jayanti) जल्लोष पाहायला मिळत आहे. शिवजयंतीनिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. लातूरमधील एका कार्यक्रमात अभिनेत्री प्रार्थना बेहेरे (Prarthana Behere) दाखल झाली होती. त्यावेळी तिने छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा एकेरी उल्लेख केला. त्यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.
लातूरच्या उदगीर येथील एका मॉलच्या उद्धाटनासाठी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे दाखल झाली होती. त्यावेळी उद्धाटनादरम्यान शुभेच्छा देताना सलग चार-पाचवेळा तिने महाराजांचा एकेरी शब्दात उल्लेख केला. त्यामुळे लातूरमधील शिवभक्तांकडून तिचा निषेध करण्यात येत आहे. तसेच अभिनेत्रीच्या स्वागतासाठी लावण्यात आलेले बॅनरदेखील फाडण्यात आले आहेत. तसेच प्रार्थनाने आता माफी मागावी, अशी मागणी शिवप्रेमींकडून करण्यात येत आहे.
नेमकं काय घडलं?
मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री प्रार्थना बेहेरे लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे एका व्यापारी प्रतिष्ठानच्या कार्यक्रमासाठी आली होती. यावेळी तिने छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केला. अभिनेत्रीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. संतप्त झालेल्या शिवप्रेमींनी उदगीर शहरामध्ये अभिनेत्रीचे लागलेले बॅनर फाडत संताप व्यक्त केला. अभिनेत्रीच्या ही बाब लक्षात आल्यानंतर तिने नवा व्हिडीओ बनवून शिवप्रेमींची माफी मागितली आहे.
View this post on Instagram
प्रार्थना बेहेरेने मागितली माफी
प्रार्थना बेहेरेने छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केल्याने शिवभक्तांनी नाराजी दर्शवत तिच्या वक्तव्याचा जाहीर निषेध नोंदवला. अभिनेत्रीने जाहीर माफी मागावी अशी मागणी केली जात होती. अशातच आता अभिनेत्रीने एक व्हिडीओ शेअर करत जाहीर माफी मागितली आहे.
View this post on Instagram
प्रार्थना बेहेरे म्हणाली आहे,"आज मी उदगीर येथे किसान मॉलच्या उद्घाटनाला आले होते. तिथे आल्यावर माझ्याकडून चुकून काही बोलण्यात आले असेल तर त्या बद्दल मी तुम्हा सर्वांची माफी मागू इच्छिते. कृपा करून मला माफ करा, माझा त्या बोलण्याचा उद्देश चुकीचा नव्हता. मी परत म्हणते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त तुम्हा सर्वांना शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराज की जय”. असे प्रार्थनाने तिच्या या माफीनाम्यात म्हटले आहे.
संबंधित बातम्या