एक्स्प्लोर

The Kerala Story Controversy: द केरळ स्टोरी चित्रपटाबाबत प्रकाश राज यांची पोस्ट; म्हणाले, 'कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत मतं मिळवण्यासाठी...'

प्रकाश राज (Prakash Raj) यांनी द केरळ स्टोरी (The Kerala Story) या चित्रपटाबाबत एक पोस्ट शेअर केली आहे.

The Kerala Storyद केरळ स्टोरी (The Kerala Story) हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. भारतात हिट ठरल्यानंतर हा चित्रपट परदेशातही रिलीज केला जात आहे.  काही लोक या चित्रपटाचं कौतुक करत आहेत, तर काही लोक या चित्रपटावर टीका करत आहेत. आता अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) यांनी नुकतीच द केरळ स्टोरी या चित्रपटाबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 

प्रकाश राज यांची पोस्ट

प्रकाश राज यांनी पोस्टमध्ये लिहिलं,  'डियर सुप्रीम लीडर, कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत मतं मिळवण्यासाठी या काल्पनिक प्रपोगंडा फिल्मचा मोठ्या प्रमाणावर प्रचार आणि वापर केल्याबाबत तुमचे  डिस्क्लेमर काय आहे?' प्रकाश राज यांनी या पोस्टमध्ये जस्ट आस्किंग  हा हॅशटॅग देखील वापरल आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Prakash Raj (@joinprakashraj)

प्रकाश राज यांच्या सोशल मीडिया पोस्ट चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी  हिटलर आणि नरेंद्र मोदी यांचा लोकांसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोला त्यांनी कॅप्शन दिलं, 'इतिहासाची पुनरावृत्ती.. काटेरी तारांमागे भविष्य आहे.. सावधान..' प्रकाश राज यांच्या  या पोस्टनं देखील नेटकऱ्यांचे लक्ष वेधले होते. 

प्रकाश राज हे सोशल मीडियावर विविध विषयांवरील आधारित पोस्ट शेअर करत असतात. त्यांना इन्स्टाग्रामवर  353K एवढे फॉलोवर्स आहेत, तर ट्विटरवर त्यांना  2.7 मिलियन फॉलोवर्स आहेत. प्रकाश राज यांनी हिंदी चित्रपटांबरोबरच दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. त्यांनी सिंघम या चित्रपटात साकरलेल्या जयकांत शिक्रे या भूमिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली. 

'द केरळ स्टोरी' या सिनेमात अदा शर्मासोबतच योगिता बिहानी, सोनिया बलानी आणि सिद्धी इडनानी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाच्या कथानकाचं आणि चित्रपटामधील कलाकारांच्या अभिनयाचं अनेक जण कौतुक करत आहेत. मुलींचं धर्म परिवर्तन करुन त्यांना दहशतवादी संघटना ISIS मध्ये कसं सामील केलं जातं हे सांगणारा 'द केरळ स्टोरी' हा सिनेमा आहे.सुदीप्तो सेन यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या:

The Kashmir Files : 'द कश्मीर फाइल्स' बोगस सिनेमा; प्रकाश राजचं वक्तव्य,अनुपम खेर यांचे सडेतोड उत्तर

महत्त्वाच्या बातम्या

Siddharth Jadhav: काँग्रेस गटनेत्या वेटिंगवर अन् सिद्धार्थ जाधवला थेट एन्ट्री; महापालिकेच्या दालनाबाहेर हायव्होल्टेज ड्रामा
काँग्रेस गटनेत्या वेटिंगवर अन् सिद्धार्थ जाधवला थेट एन्ट्री; महापालिकेच्या दालनाबाहेर हायव्होल्टेज ड्रामा
Pranit More: 'प्रणित तू चांगला मुलगा, पण...'', प्रसिद्ध अभिनेत्रीचा कॉमेडियन मोरेला सपोर्ट; कमेंट करत भरभरुन सांगितलं
'प्रणित तू चांगला मुलगा, पण...'', प्रसिद्ध अभिनेत्रीचा कॉमेडियन मोरेला सपोर्ट; कमेंट करत भरभरुन सांगितलं
Prajakta Mali: प्राजक्ता माळीकडून गुडन्यूज; लवकरच साऊथ सिनेमात झळकणार अभिनेत्री, कोणत्या हिरोसोबत स्क्रीन शेअर करणार?
प्राजक्ता माळीकडून गुडन्यूज; लवकरच साऊथ सिनेमात झळकणार अभिनेत्री, कोणत्या हिरोसोबत स्क्रीन शेअर करणार?
Sachin Pilgaonkar: सचिन पिळगावकरांनी पहिल्यांदा किचनमध्ये कधी पाऊल ठेवलं, लाडक्या लेकीसाठी पहिला कोणता पदार्थ तयार केला?
सचिन पिळगावकरांनी पहिल्यांदा किचनमध्ये कधी पाऊल ठेवलं, लाडक्या लेकीसाठी पहिला कोणता पदार्थ तयार केला?

व्हिडीओ

Mountaineer Umesh Zirpe On Majha Katta : यावेळीची मोहीम कशी होती? झिरपेंनी सांगितला थरारक अनुभव
Women Power : महिलांनी घेतला निर्धार अन् बदललं गावाचं चित्र; 'महिला शक्ती कमांडो'ची यशोगाथा | Special Report
Jamun & Drought : जांभळाचा सडा आणि दुष्काळाचा इशारा? निसर्ग काय सांगतोय? | Special Report
Crime Patrol Style Theft Special Report : 'क्राईम पेट्रोल' पाहून रचला चेन स्नॅचिंगचा कट; पोलिसांनी मुसक्या आवळल्या
Jalgaon MLC Election Special Report : नाशकातील बंडखोरी मिटली, पण जळगावचा पेच कायम! शिवसेनेच्या रेश्मा काळे 'नॉट रिचेबल'!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray Shivsena UBT MP Meeting Mumbai: एकीकडे ऑपरेशन टायगरची चर्चा, दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी आज बोलावली खासदारांची बैठक; कोणकोण उपस्थित राहणार?
एकीकडे ऑपरेशन टायगरची चर्चा, दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी आज बोलावली खासदारांची बैठक; कोणकोण उपस्थित राहणार?
Rohit Pawar Protest : रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा, तिसऱ्या दिवशीही अन्नत्याग आंदोलन सुरूच राहणार; वडील राजेंद्र पवार म्हणाले, 'मी रोहितचा बाप असलो तरी....',
रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा, तिसऱ्या दिवशीही अन्नत्याग आंदोलन सुरूच राहणार; वडील राजेंद्र पवार म्हणाले, 'मी रोहितचा बाप असलो तरी त्याला शेतकऱ्यांच्या ओटीत टाकलंय',
India vs Afghanistan, 1st ODI: टीम इंडियाची अफगाणिस्तानविरुद्ध शानदार विजयी सलामी, गिलची 'कॅप्टन' इनिंग, केएल राहुलने कळस चढवला; गुरबाजचे विक्रमी शतक व्यर्थ
टीम इंडियाची अफगाणिस्तानविरुद्ध शानदार विजयी सलामी, गिलची 'कॅप्टन' इनिंग, केएल राहुलने कळस चढवला; गुरबाजचे विक्रमी शतक व्यर्थ
Rohit Sharma Video: रोहित शर्माचा दुर्दैवाचा फेरा सुरुच, दुखापतीतून सावरून आला, पहिल्याच ओव्हरमध्ये मनगटाच्या वेदनेनं तळमळला, पुन्हा उभा राहिला, पण जम बसण्यापूर्वीच रन आऊटने घात केला
Video: रोहित शर्माचा दुर्दैवाचा फेरा सुरुच, दुखापतीतून सावरून परतला, पहिल्याच ओव्हरमध्ये मनगटाच्या वेदनेनं तळमळला, पुन्हा उभा राहिला, पण जम बसण्यापूर्वीच रन आऊटने घात केला
होर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांचे आदेशांचे पालन करा, नाकेबंदी तोडल्यास कारवाई केली जाईल; आंतरराष्ट्रीय पाण्यातही अमेरिकेचा भारताला सज्जड दम, तीन दिवसात अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यात तीन भारतीयांचा मृत्यू
होर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांचे आदेशांचे पालन करा, नाकेबंदी तोडल्यास कारवाई केली जाईल; आंतरराष्ट्रीय पाण्यातही अमेरिकेचा भारताला सज्जड दम, तीन दिवसात अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यात तीन भारतीयांचा मृत्यू
लातूरमध्ये तीन गाड्यांचा भीषण अपघात; दुचाकीवर पत्नी-पत्नीचा मृत्यू, वॅगनॉरमधील 1 ठार, 2 जखमी
लातूरमध्ये तीन गाड्यांचा भीषण अपघात; दुचाकीवर पत्नी-पत्नीचा मृत्यू, वॅगनॉरमधील 1 ठार, 2 जखमी
India vs Afghanistan, 1st ODI: अफगाणिस्तानचे टीम इंडियासमोर 195 धावांचे आव्हान; गुरनूर ब्रार अन् हर्ष दुबे पदार्पणातच 3-3 विकेट घेत चमकले; गुरबाजने 48 चेंडूत शतक ठोकत 21 वर्षांचा विक्रम मोडला
अफगाणिस्तानचे टीम इंडियासमोर 195 धावांचे आव्हान; गुरनूर ब्रार अन् हर्ष दुबे पदार्पणातच 3-3 विकेट घेत चमकले; गुरबाजने 48 चेंडूत शतक ठोकत 21 वर्षांचा विक्रम मोडला
देवेंद्र फडणवीस म्हणाले, फोटोची गरज नाही, आम्ही त्यांना प्रपोजल दिलंय; पुण्यातील राजकीय वर्तुळात चर्चा
देवेंद्र फडणवीस म्हणाले, फोटोची गरज नाही, आम्ही त्यांना प्रपोजल दिलंय; पुण्यातील राजकीय वर्तुळात चर्चा
Embed widget