Prajakta Mali : प्राजक्ता माळीच्या फार्महाऊसला जायचा विचार करताय? जाणून घ्या भाडं, नियम आणि अटींबद्दल...
Prajakta Mali : प्राजक्ता माळीने कर्जतमध्ये एक फार्महाऊस विकत घेतलं आहे.
Prajakta Mali : मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीचं स्वप्न साकार झालं आहे. तिने कर्जतमध्ये फार्महाऊस (Prajakta Mali Karjat Farmhouse) घेतलं आहे. पण अभिनेत्रीच्या फार्म हाऊसमध्ये वेळ घालवण्यासाठी पर्यटकांना विशेष भाडं आणि काही नियम व अटीदेखील आहेत.
प्राजक्ता माळीने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर फार्महाऊसमधील फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. 'याचसाठी केला होता अट्टाहास' असं ती म्हणाली होती. तसेच 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाची टीमदेखील प्राजक्ताच्या वाढदिवशी या फार्महाऊसवर गेली होती.
View this post on Instagram
प्राजक्ताच्या फार्महाऊसमध्ये पर्यटकांना निवांत वेळ घालवता येणार आहे. प्राजक्ताचं हे फार्म हाऊस निसर्गाच्या कुशीत आहे. तिने फोटो शेअर केल्यानंतर अनेक चाहत्यांनी या फार्महाऊसमध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता अभिनेत्रीने हे फार्महाऊस भाड्याने द्यायला सुरुवात केली आहे.
प्राजक्ताच्या फार्महाऊसमध्ये निवांत क्षण घालवण्याचा विचार करताय?
प्राजक्ताच्या फार्महाऊसमध्ये जाण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला चांगलेच पैसे मोजावे लागणार आहेत. प्राजक्ता माळीचा 3 बीएचके व्हीला आहे. या व्हीलाचं एका रात्रीचं भाडं खिशाला कात्री लावणारं आहे. कर्जतमधल गौळवाळी गावात प्राजक्ताने फार्महाऊस खरेदी केलं आहे.
3 बेडरूम्स, हॉल, किचन , स्विमिंगपूल असं तिचं आलिशान फार्महाऊस आहे.
प्राजक्ताने 'Stay Leisurely' यांच्याकडे तिचं फार्महाऊस हँडओव्हर केलं आहे. प्राजक्ताच्या फार्महाऊसचं नाव ग्रीन मोन्टाना असं आहे. या फार्महाऊसमध्ये एकावेळी 15 पेक्षा अधिक मंडळी राहू शकतात. या फार्महाऊसमध्ये दोन व्यक्तींना एक रात्र राहायचं असेल तर त्यासाठी 20,250 रुपये मोजावे लागणार आहेत. जेवणाचा वेगळा खर्च असणार आहे.
फार्महाऊसमधील स्वयंपाकघरात ओव्हन, गॅस अशा सुविधा दिलेल्या आहेत. पण या फार्महाऊसमध्ये जेवण बनवायला बंदी आहे. जवळच्या हॉटेलमधून पर्यटक ऑर्डर करू शकतात. ते जेवण गरम करण्यासाठी ओव्हन आणि गॅसचा वापर करता येऊ शकतो.
पाळीव प्राण्यांना बंदी...
फार्महाऊसमधून जेवण घ्यायचं असेल तर प्रती व्यक्ती 600 रुपये खर्च आहे. यात सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचा नाश्ता आणि रात्रीच्या जेवणाचा समावेश असेल. या फार्महाऊसमध्ये पाळीव प्राण्यांना घेऊन जाता येणार नाही.
संबंधित बातम्या