Prajakta Mali: प्राजक्ताचं स्वप्न झालं साकार; कर्जतमध्ये घेतलं फार्म हाऊस, पोस्ट शेअर करत म्हणाली, 'खानदानातल्या सर्वात मोठ्या कर्जासहीत...'
कर्जतमधील फार्म हाऊस प्राजक्तानं (Prajakta Mali) विकत घेतलं आहे. एक खास पोस्ट शेअर करुन प्राजक्तानं या फार्म हाऊसची माहिती नेटकऱ्यांना दिली.
Prajakta Mali: मराठी मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) ही तिच्या अभिनयानं आणि नृत्यशैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकत असते. प्राजक्ता ही सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या वैयक्तिक आयुष्याची माहिती चाहत्यांना देते. नुकतीच प्राजक्तानं एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून प्राजक्तानं तिच्या फार्म हाऊसची माहिती दिली आहे. कर्जतमधील फार्म हाऊस प्राजक्तानं विकत घेतलं आहे.
प्राजक्ताची पोस्ट
प्राजक्तानं तिच्या फार्म हाऊसच्या बाहेरील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोला तिनं कॅप्शन दिलं, 'स्वप्न साकार… Happy owner of my dream “Farm House” डोंगराच्या कुशीत, निसर्गाच्या सानिध्यात घर पाहिजे, एवढीच अट होती. अगदी मनासारखं घर मिळालं. नाव असणार आहे- “प्राजक्तकुंज”. (1- प्राजक्तप्रभा, 2- प्राजक्तराज 3- प्राजक्तकुंज, प्राजक्तत्रयी पुर्ण.) खानदानातली सर्वात सुंदर प्रॉपर्टी, खानदानातल्या सर्वात मोठ्या कर्जासहीत..फेडू.. फक्त तुमचा आशिर्वाद राहू द्या.' प्राजक्ताच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केल आहे. प्राजक्ताच्या या पोस्टला कमेंट करुन अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. फुलवा खामकर, अमृता खानविलकर, सलील कुलकर्णी, ऋतुजा बागवे या सेलिब्रिटींनी प्राजक्ताच्या पोस्टला कमेंट करुन तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
View this post on Instagram
प्राजक्ताचे चाहते तिच्या नव्या प्रोजेक्टची वाट बघत असतात. काही दिवसांपूर्वी तिची रानबाझार ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस आली. या सीरिजमध्ये प्राजक्तानं रत्ना ही भूमिका साकारली आहे. रानबाझार या सीरिजमधील प्राजक्ताच्या अभिनयाचं अनेक लोकांनी कौतुक केलं. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमामधून देखील प्राजक्ता प्रेक्षकांच्या भेटीस येते. या कार्यक्रमाचं ती सूत्रसंचालन करते. जुळून येती रेशिमगाठी या मालिकेमुळे प्राजक्ताला विशेष लोकप्रियता मिळाली. प्राजक्ता ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. वेगवेगळ्या लूकमधील फोटो आणि आगामी प्रोजेक्टची माहिती ती सोशल मीडियाच्या माध्यमातून देते. प्राजक्ताला इन्स्टाग्रामवर 2 मिलियन फॉलोवर्स आहेत.
View this post on Instagram
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Prajakta Mali: 'तू देवदूत आहेस'; प्राजक्तानं समीर चौघुलेसाठी शेअर केली पोस्ट