Prabhu Deva: वयाच्या 50 व्या वर्षी प्रभू देवा झाला बाप; दुसऱ्या पत्नीनं दिला मुलीला जन्म
प्रभूदेवा (Prabhu Deva) हा वयाच्या 50 व्या वर्षी बाप झाला आहे. प्रभूदेवानं एका मुलाखतीमध्ये ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिला आहे.
![Prabhu Deva: वयाच्या 50 व्या वर्षी प्रभू देवा झाला बाप; दुसऱ्या पत्नीनं दिला मुलीला जन्म prabhu deva became father for fourth time second wife himani gave birth to daughter Prabhu Deva: वयाच्या 50 व्या वर्षी प्रभू देवा झाला बाप; दुसऱ्या पत्नीनं दिला मुलीला जन्म](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/12/aa2a0b1e99818ce4d0a901e17563d56c1686569142712259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Prabhu Deva: बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर दिग्दर्शक प्रभूदेवा (Prabhu Deva) हा वयाच्या 50 व्या वर्षी बाप झाला आहे. प्रभूदेवाची दुसरी पत्नी हिमानीनं एका मुलीला जन्म दिला आहे. प्रभूदेवानं एका मुलाखतीमध्ये ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिला आहे.
एका मुलाखतीमध्ये प्रभूदेवाने ही आनंदाची बातमी दिली आहे. त्यानी सांगितले की, 'होय ही बातमी खरी आहे. या वयात म्हणजेच 50 व्या वर्षी मी पुन्हा बाप झालो आहे आणि मी खूप आनंदी आहे.'
पुढे प्रभूदेवानं सांगितलं, 'आता मी माझे काम खूप कमी केले आहे. कारण बरेच दिवस मला वाटत होते की. मी केवळ इकडून तिकडे पळत आहे. पण आता सर्व काम पूर्ण झाले आहे. आता या गर्दीपासून दूर राहून मला माझ्या कुटुंबासोबत वेळ घालवायचा आहे.' प्रभू देवाने 2020 मध्ये हिमानीसोबत विवाह केला होता. हिमानी सिंह ही डॉक्टर आहे.
पत्नीपासून झाला विभक्त
प्रभूदेवानं 1995 मध्ये रामलथसोबत (Ramlath) लग्न केले. रामलथ ही देखील नृत्यांगना आणि कोरिओग्राफर होती. लग्नानंतर प्रभूदेवा आणि रामलथ यांना तीन मुले झाली, मात्र मोठा मुलगा बसवराजू सुंदरम याचे 2008 मध्ये निधन झाले त्यानंतर 3 वर्षांनी प्रभूदेवा रामलथपासून विभक्त झाला.
View this post on Instagram
प्रभूदेवाचा चाहता वर्ग मोठा आहे. तो सोशल मीडियावर देखील अॅक्टिव्ह असतो. सोशल मीडियाच्या माध्यामातून प्रभूदेवा हा त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सची माहिती चाहत्यांना देतो. इन्स्टाग्रामवर त्याला 466K फॉलोवर्स आहेत. 1994 मध्ये प्रभूदेवनं 'निधू' चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता म्हणून एन्ट्री केली. यानंतर प्रभूदेवाने एकामागून एक अनेक चित्रपटात काम केले केले. हळूहळू प्रभूदेवानं दिग्दर्शन क्षेत्रात देखील काम करण्यास सुरुवात केली. 'मुक्काला मुकाबला' (Muqabla) या गाण्यामध्ये प्रभूदेवाने डान्स केला. त्यानंतर त्याची लोकप्रियता आणखी वाढली. प्रभूदेवा हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. काही वर्षांपूर्वी प्रभूदेवाचं नाव अभिनेत्री नयनतारासोबत (Nayanthara) जोडलं जात होतं. अनेक कार्यक्रमांमध्ये देखील प्रभूदेवा आणि नयनतारा हे एकत्र दिसले होते.
महत्वाच्या इतर बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)