Poonam Pandey Exclusive : दोन दिवसांपूर्वी मुंबईत शूटिंग करत होती पूनम पांडे; डिझायनर रोहित वर्माची एबीपी माझाला माहिती
Rohit Verma on Poonam Pandey : डिझायनर रोहित वर्मा दोन दिवसांपूर्वी पूनम पांडेसोबत शूट करत होता. त्यामुळे अभिनेत्रीच्या निधनावर त्याचा विश्वास बसलेला नाही.
Poonam Pandey Death : अभिनेत्री पूनम पांडेचं (Poonam Pandey) सर्वायकल कॅन्सरने (Cervical Cancer) वयाच्या 32 व्या वर्षी निधन झालं आहे. तिच्या निधनाने चाहत्यांसह मनोरंजनसृष्टीलाही मोठा धक्का बसला आहे. एकीकडे अभिनेत्रीच्या निधनाने चाहत्यांना धक्का बसला असला तर दुसरीकडे नेटकरी मात्र तिच्या मृत्यूला पब्लिसिटी स्टंट म्हणत आहेत. दोन दिवसांपूर्वी पूनम बॉलिवूडचा लोकप्रिय डिझायनर रोहित वर्मासोबत (Rohit Verma) शूट करत होती.
दोन दिवसांपूर्वी शूटिंग करत होती पूनम पांडे
एबीपी न्यूजसोबत बोलताना डिझायनर रोहित वर्मा म्हणाला,"दोन दिवसांपूर्वी पूनम माझ्यासोबत शूट करत होती. त्यावेळी ती पूर्णपणे फिट दिसत होती. तिची तब्येत खालावली असं कुठेही दिवस नव्हतं. त्यामुळे तिला कॅन्सर झाल्याचा अंदाज आला नाही. टीमने मला दिलेल्या माहितीनुसार, पूनम तिच्या गावी कानपूरला गेली होती. तिथे तिचा मृत्यू झाला आहे". पूनम पांडे दोन दिवसांपूर्वी मुंबईत शूटिंग करत होती. आता ती या जगात नाही, यावर रोहित वर्माचादेखील विश्वास बसत नाही.
रोहित वर्माने पूनम पांडेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत तिने लिहिलं आहे,"तू खरचं एक अनोखी भेट आहेस. नेहमी स्वत:ची वाढ कशी होईल याचा विचार करा. स्वत:ला कमी लेखणं थांबवा. तुम्हीच तुमचा सर्वात मोठा चाहता आहात. तुम्ही मौल्यवान आहात याचा कायम विचार करा".
View this post on Instagram
लोकप्रिय अभिनेत्री, मॉडल पूनम पांडेचं (Poonam Pandey) सर्वायकल कॅन्सर कॅन्सरने निधन झालं आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अभिनेत्रीच्या निधनाची बातमी देण्यात आली आहे. पूनमच्या निधानाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. वयाच्या 32 व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला आहे. पूनमचा मृत्यू हा पब्लिसिटी स्टंट असल्याचंही म्हटलं जात आहे.
कोण आहे पूनम पांडे (Who is Poonam Pandey)
पूनम पांडेने 2013 मध्ये नशा या सिनेमाच्या माध्यमातून मनोरंजनसृष्टीत पाऊल ठेवलं. त्यानंतर 'द जर्नी ऑफ कर्मा' आणि 'मालिनी अँड कंपनी', 'दिल बोले हडिप्पा' अशा अनेक सिनेमांत तिने आपल्या अभिनयाची झलक दाखवली. छोट्या पडद्यावरील 'आशिकी तुमसेही', 'नादानिया', फिअर फॅक्टर : खतरो के खिलाडी या शोमध्ये देखील ती झळकली होती.
संबंधित बातम्या