(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ponniyin Selvan box office collection : 'पोन्नियिन सेलवन'ची बॉक्स ऑफिसवर गाडी सुसाट; पाच दिवसांत केली 150 कोटींची कमाई
Ponniyin Selvan : 'पोन्नियिन सेलवन' हा सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे.
Ponniyin Selvan box office collection Day 5 : 'पोन्नियिन सेलवन' (Ponniyin Selvan) हा सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे. तीन दिवसांत 100 कोटींचा टप्पा पार केलेला 'पोन्नियिन सेलवन' बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात यशस्वी ठरला आहे.
तीन दिवसांत 100 कोटींचा टप्पा पार
'पोन्नियिन सेलवन' हा सिनेमा 30 सप्टेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित झाला. रिलीजच्या पहिल्याच दिवशी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 36.5 कोटींची कमाई केली. तर शनिवारी 34.6 कोटी आणि रविवारी 39.2 कोटींची कमाई केली आहे. अशाप्रकारे तीन दिवसांत या सिनेमाने 100 कोटींचा टप्पा पार केला.
'पोन्नियिन सेलवन'ने सोमवारी 19.25 कोटींची कमाई केली होती. तर रिलीजच्या पाचव्या दिवशी या सिनेमाने 23.50 कोटींची कमाई केली आहे. अशाप्रकारे आतापर्यंत 'पोन्नियिन सेलवन' या सिनेमाने 153.05 कोटींची कमाई केली आहे. जगभरात या सिनेमाने 200 कोटींचा टप्पा पार केला आहे. 500 कोटींच्या बजेटमध्ये या सिनेमाची निर्मिती करण्यात आली होती.
View this post on Instagram
'पोन्नियिन सेलवन' या सिनेमात विक्रम, जय रवी, कार्थी, तृषा आणि ऐश्वर्या राय बच्चन मुख्य भूमिकेत आहेत. तर एआर रहमानने या सिनेमातील गाणी संगीतबद्ध केली आहेत. 'पोन्नियिन सेलवन' हा सिनेमा दोन भागांत प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा कल्कि यांच्या कादंबरीवर आधारित आहे.
संबंधित बातम्या