एक्स्प्लोर
पुलं-सुनिताबाईंची भूमिका असलेल्या सिनेमाचं दुर्मिळ फूटेज राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे
पुलं देशपांडे आणि वंदे मातरम् चित्रपटाचे संगीतकार सुधीर फडके अर्थात बाबुजींच्या जन्मशताब्दी वर्षात हे फूटेज मिळणं हा दुग्धशर्करा योग असल्याच्या भावना एनएफएआयचे संचालक प्रकाश मगदूम यांनी व्यक्त केल्या.
मुंबई : महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे आणि त्यांच्या पत्नी सुनिताबाई देशपांडे यांची मुख्य भूमिका असलेल्या वंदे मातरम् (1948) चित्रपटातील दुर्मिळ चित्रफीत राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (नॅशनल फिल्म्स अर्काईव्ह्ज ऑफ इंडिया - एनएफएआय) कडे सुपूर्द करण्यात आली आहे.
पुलंचे भाचे दिनेश ठाकूर आणि चित्रपट इतिहासकार सतीश जकातदार यांनी चित्रपटातील 35 मिनिटांचं फूटेज असलेली वीएचएस कॅसेट संग्रहालयाला दान केली. याशिवाय पुलं देशपांडे पेटी (हार्मोनियम) वाजवत असल्याचं तासाभराचं फूटेज असलेल्या दोन यू-मॅटिक टेपही संग्रहालयाला सुपूर्द करण्यात आल्या.
पुलं देशपांडे आणि वंदे मातरम् चित्रपटाचे संगीतकार सुधीर फडके अर्थात बाबुजींच्या जन्मशताब्दी वर्षात हे फूटेज मिळणं हा दुग्धशर्करा योग असल्याच्या भावना एनएफएआयचे संचालक प्रकाश मगदूम यांनी व्यक्त केल्या. संबंधित चित्रण हरवल्याचं मानलं जात होतं. विशेष म्हणजे या चित्रपटाचे लेखक-गीतकार ग. दि. माडगूळकर अर्थात गदिमा यांचंही हे जन्मशताब्दी वर्ष आहे. या निमित्ताने हा त्रिवेणी संगम जुळून आला.
वंदे मातरम् हा चित्रपट भारत स्वातंत्र्य झाल्याच्या एका वर्षानंतर म्हणजे 1948 साली प्रदर्शित झाला होता. राम गबाळेंनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यावर या चित्रपटाचं कथानक आधारित होतं.पी एल देशपांडे और उनकी पत्नी सुनीता देशपांडे अभिनीत फिल्म #वंदेमातरम (1948) की दुर्लभ फुटेज के साथ पीएल देशपांडे द्वारा हारमोनियम बजाता हुआ फुटेज अब रा.फि.सं. के संग्रह का हिस्सा है। सुनीता देशपांडे के भतीजे दिनेश ठाकुर और सतीश जकातदार के साथ प्रकाश मगदूम, निदेशक, रा.फि.सं.। pic.twitter.com/5BZXvCKffg
— NFAI (@NFAIOfficial) July 9, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
बीड
Advertisement