Pawan Singh: भर कार्यक्रमामध्ये पवन सिंहला फेकून मारला दगड; अभिनेता भडकला, व्हिडीओ व्हायरल
भोजपुरी अभिनेता आणि गायक पवन सिंहनं (Pawan Singh) एका कार्यक्रमामध्ये हजेरी लावली होती. या कार्यक्रमाच्या प्रेक्षकांमधील एका व्यक्तीनं पवन सिंहला दगड फेकून मारला.
Pawan Singh Stage Show Incident Video Going Viral: हिंदी,भोजपुरी तसेच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी त्यांच्या चाहत्यांनी काल (7 मार्च) धुलिवंदनच्या शुभेच्छा दिल्या. विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन सेलिब्रिटींनी प्रेक्षकांचे मनोरंजन केलं. भोजपुरी अभिनेता आणि गायक पवन सिंहनं (Pawan Singh) देखील एका कार्यक्रमामध्ये हजेरी लावली होती. यावेळी प्रेक्षकांमधील एका व्यक्तीनं पवन सिंहला दगड फेकून मारला. त्यानंतर पवन भडकला. कार्यक्रमामधील पवन सिंहचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
स्टेजवर परफॉर्म करताना भडकला पवन सिंह
पवन सिंहनं स्टेजवर परफॉर्म करत होता. त्याच्यासोबत काही महिला देखील परफॉर्म करत होत्या.पवन सिंह हा परफॉर्म करत असताना प्रेक्षकांमधील एका व्यक्तीनं त्याला दगड फेकून मारला. त्यानंतर पवन भडकला. तो म्हणाला, 'हा दगड कोणी मारला? मी काही बोलत नाही म्हणून असं होतं. जर हिंमत असेल तर समोर ये.'
पवन सिंहच्या कार्यक्रमातील व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, पवन सिंहला एक प्रेक्षक दगड फेकून मारतो, त्यानंतर त्याची टीम स्टेजवर येते. स्टेजवर परफॉर्म करणाऱ्या मुली देखील घाबरतात. व्हायरल व्हिडीओमध्ये पवन हा चिडलेला दिसत आहे. 'नागरा, बलिया येथे भोजपुरी स्टार पवन सिंगवर कोणीतरी दगड फेकला, शो दरम्यान चेंगराचेंगरी झाली, पोलिसांनी लाठीचार्ज केला.' असं कॅप्शन या व्हायरल व्हिडीओला देण्यात आलं आहे.
नेटकऱ्यांच्या कमेंट्स
पवन सिंहच्या कार्यक्रमातील व्हायरल व्हिडीओला एका नेटकऱ्यांनं कमेंट केली. 'भारतात हे काय सुरु आहे. सगळीकडे द्वेष दिसत आहे.'
पाहा व्हिडीओ:
View this post on Instagram
पवन सिंहचे चित्रपट
पवन सिंह हा भोजपुरी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायक आणि अभिनेता आहे. त्यानं 80 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. भोजपुरिया दरोगा, प्रतिज्ञा, दरार या चित्रपटांमध्ये काम केलं. त्यानं वेब सीरिजमध्ये देखील काम केलं आहे. त्यानं प्रपंच नावाच्या वेब सीरिजमध्ये मुख्य भूमिका साकारली आहे. याद आती नही, जिंदगी ही गाणी पवन सिंहनं गायली आहेत.
महत्वाच्या इतर बातम्या: