(Source: ECI/ABP News/ABP Majha)
विकी कौशल ते रवीना टंडन; पठाणचं 'या' बॉलिवूड कलाकारांकडून तोंडभरुन कौतुक
रवीना टंडन (Raveena Tandon), हृतिक रोशन (Hrithik Roshan), विकी कौशल (Vicky Kaushal), अर्जुन कपूर (Arjun Kapoor) या सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पठाण या चित्रपटाच्या टीमचं कौतुक केलं आहे.
Pathan: अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) पठाण (Pathan) 25 जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. या चित्रपटाचं अनेक जण कौतुक करत आहेत. बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटींनी पठाण या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. रवीना टंडन (Raveena Tandon), हृतिक रोशन (Hrithik Roshan), विकी कौशल (Vicky Kaushal), अर्जुन कपूर (Arjun Kapoor) या सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पठाण या चित्रपटाच्या टीमचं कौतुक केलं आहे.
रवीना टंडन (Raveena Tandon)
अभिनेत्री रवीना टंडननं ट्विटरवर ट्वीट शेअर करुन लिहिलं, 'पठाण, OMG! विलक्षण! शाहरुख खान, दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम, हे फॅनटॅस्टिक आहेत.'
#pathan OMG ! Blown away! Just fantastic ! @iamsrk @deepikapadukone #johnabraham. Just fantastic! Thank you being the reason for the industry to celebrate again! @yrf #sidharthanand
— Raveena Tandon (@TandonRaveena) January 25, 2023
हृतिक रोशन (Hrithik Roshan)
'What a trip. पूर्वी कधीही न पाहिलेले व्हिज्युअल, चांगली पटकथा, अप्रतिम संगीत, आश्चर्य ट्विस्ट. सिड तू पुन्हा हे करुन दाखवलंस, आधी तुझे धैर्य पाहून मी थक्क होतो. शाहरुख, दीपिका, जॉन आणि संपूर्ण टीमचे अभिनंदन.' असं ट्वीट हृतिकनं शेअर करुन पठाणच्या टीमचं कौतुक केलं आहे.
What a trip. Incredible vision , some never seen before visuals, tight screenplay, amazing music, surprises and twists all the way thru. Sid you have done it again, Adi your courage astounds me. Congrats Shahrukh, Deepika, John n the entire team. #pathaan 👊
— Hrithik Roshan (@iHrithik) January 26, 2023