Pathaan Trailer: 'हा रणवीर सिंह आहे?'; पठाणचा ट्रेलर रिलीज होताच नेटकऱ्यांना पडला प्रश्न
पठाणचा (Pathaan) ट्रेलर वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. या ट्रेलरमध्ये अभिनेता रणवीर सिंहची (Ranveer Singh) झलक दिसत आहे, असं काही नेटकऱ्यांचे मत आहे.
Pathaan Trailer: बॉलिवूडमधील शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या ट्रेलरमधील शाहरुख आणि जॉन अब्राहमच्या (John Abraham) अॅक्शननं तसेच दीपिका पादुकोणच्या (Deepika Padukone) लूक्सनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. पण हा ट्रेलर वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. या ट्रेलरमध्ये अभिनेता रणवीर सिंहची (Ranveer Singh) झलक दिसत आहे, असं काही नेटकऱ्यांचे मत आहे.
नेटकऱ्यांनी शेअर केले ट्वीट
एका नेटकऱ्यानं पठाणच्या ट्रेलरमधील एका सिनचा स्क्रिनशॉर्ट ट्विटरला शेअर करुन लिहिलं, 'हा रणवीर सिंह आहे का?' तर दुसऱ्या युझरनं लिहिलं, 'पठाणमध्ये रणवीर पण आहे का?' आता नेटकऱ्यांचे हे ट्वीट व्हायरल होत आहेत. आता रणवीर हा पठाणमध्ये कोणती भूमिका साकारणार आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
पाहा नेटकऱ्यांचे ट्वीट
Is This Ranveer Singh In #PathaanTrailer pic.twitter.com/dL2XTYaQNP
— Being Arman (@BhatRaja_S) January 10, 2023
Ranveer Singh Cameo Roll Waah 😍😍 #PathaanTrailer #pathaan #ShahRukhKhan𓀠 #DeepikaPadukone #JohnAbraham #SpyUniverse #RanveerSingh #Bollywood pic.twitter.com/DxQW9iiE0b
— 🇼🇦🇸🇮🇲 ˢʰᵃʰ (@WasimSRK_) January 10, 2023
Pathan main ranveer singh bhi hai? 😂#PathaanTrailer pic.twitter.com/8d0sc1YFSl
— Prayag (@theprayagtiwari) January 10, 2023
काही दिवसांपूर्वी रणवीरचा सर्कस हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. आता रणवीरच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
पठाण चित्रपटातील बेशरम रंग आणि झुमे जो पठाण ही गाणी काही दिवसांपूर्वी रिलीज झाली. पठाण हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. भारताव्यतिरिक्त स्पेन, यूएई, तुर्की, रशिया, सायबेरिया, इटली, फ्रान्स आणि अफगाणिस्तान या देशांमध्ये या चित्रपटाचं चित्रीकरण झाले आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलगू या भाषेंमध्ये प्रदर्शित होणार आहे.
सिद्धार्थ आनंदने या सिनेमाच्या दिग्दर्शन केलं आहे. शाहरुखसोबतच पठाण चित्रपटात दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. 250 कोटींच्या बजेटमध्ये 'पठाण' या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. शाहरुखचे चाहते या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: