Shah Rukh Khan On Pathaan: दीपिकासाठी गायलं गाणं, सलमानचे मानले आभार तर जॉनला दिली पप्पी; पठाणच्या यशानंतर शाहरुखचा खास अंदाज
पठाण (Pathaan) या चित्रपटाच्या टीमनं एका पत्रकार परिषदेचे आयोजन केलं. शाहरुखनं (Shah Rukh Khan) या पत्रकार परिषदेमध्ये पठाण चित्रपटाला मिळालेल्या यशाबद्दल प्रेक्षकांचे आभार मानले.
Shah Rukh Khan On Pathaan: पठाण (Pathaan) हा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आहे. देशातच नाही तर परदेशातही या चित्रपटानं कोट्यवधींची कमाई केली आहे. या चित्रपटाला यश मिळत असतानाच या चित्रपटाच्या स्टार कास्टनं आणि दिग्दर्शकानं एका पत्रकार परिषदेचे आयोजन केलं. या पत्रकार परिषदेमध्ये शाहरुख खान (Shah Rukh Khan) , दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि जॉन अब्राहम (John Abraham) यांच्यासोबतच चित्रपटाचा दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदनं देखील हजेरी लावली. यावेळी शाहरुख हा अतिशय आनंदी दिसला. शाहरुखनं या पत्रकार परिषदेमध्ये पठाण चित्रपटाला मिळालेल्या यशाबद्दल प्रेक्षकांचे आभार मानले. तसेच त्यानं दीपिकासाठी गाणं गायलं.
जॉनला केलं किस
शाहरुखनं या पत्रकार परिषदेमध्ये पठाणमधील जॉनच्या भूमिकेची माहिती दिली. या दरम्यान शाहरुखनं जॉनला किस केलं. त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित असलेले लोक 'दीपिका दीपिका' असं म्हणत होते. यावर शाहरुख म्हणतो, 'मी दीपिकाला असं अनेकवेळा केलं आहे. जॉनला पहिल्यांदा करतोय.' त्यानंतर जॉन म्हणतो, 'एवढं प्रेम...'
View this post on Instagram
दीपिकासाठी गायलं गाणं
पठाणबरोबरच ‘ओम शांति ओम’ आणि 'चेन्नई एक्सप्रेस' या चित्रपटांमध्ये शाहरुखनं दीपिकासोबत काम केलं. आहे. पठाण चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत शाहरुखनं त्याच्या ‘ओम शांति ओम’ या चित्रपटातील ‘आंखों में तेरी’ हे गाणं दीपिकासाठी गायलं.
Our hearts melted here 🥺
— Shah Rukh Khan Universe Fan Club (@SRKUniverse) January 30, 2023
Our Om (@iamsrk) singing “Aankhon Mein Teri” for Shanti (@deepikapadukone) ❤️
PATHAAN 500 CR IN 5 DAYS
Book your tickets NOW:https://t.co/z4YLOG2NRIhttps://t.co/lcsLnUSu9Y@iamsrk @yrf #Pathaan #SRK #DeepikaPadukone #JohnAbraham pic.twitter.com/6hJkuLuxrn
सलमानचे मानले आभार
पठाण चित्रपटात सलमान खाननं कॅमिओ केला आहे. या चित्रपटात काम केल्याबद्दल शाहरुखनं सलमानचे आभार मानले.
Latest-"sharukh khan thanks to our bhaijaan #SalmanKhan for his cameo on pathan .
— BeingGaganMeena (@GaganMe35663323) January 30, 2023
Srk said - Thankyou #salman for making this film so wonderful. 🔥🔥 pic.twitter.com/Dp4siQjHD5
रवीना टंडन (Raveena Tandon), हृतिक रोशन (Hrithik Roshan), विकी कौशल (Vicky Kaushal), अर्जुन कपूर (Arjun Kapoor) या सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पठाण या चित्रपटाच्या टीमचं कौतुक केलं.
महत्वाच्या इतर बातम्या: