Parineeti Chopra Stylist Reaction: परिणीतीनं कियारा आणि आलियाचा ब्रायडल लूक केला कॉपी? स्टायलिस्ट म्हणाली...
Parineeti Chopra Stylist Reaction: परिणीतीने कियारा आडवाणी (Kiara Advani) आणि आलिया भट्टचा (Alia Bhatt) ब्रायडल लूक कॉपी केला आहे, असे काही अनेकांचे मत आहे.
Parineeti Chopra Stylist Reaction: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री परिणीती चोप्राने (Parineeti Chopra) 24 सप्टेंबरला राघव चड्ढा (Raghav Chadha) यांच्यासोबत लग्न केले. परिणीती आणि राघव यांचा विवाह सोहळा उदयपूर येथे पार पडला. त्यांच्या लग्नसोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. परिणीतीने तिच्या लग्नात पेस्टल कलरचा लेहंगा परिधान केला होता. परिणीतीच्या लग्नसोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर परिणीतीला अनेकांनी ट्रोल केले. परिणीतीने कियारा आडवाणी (Kiara Advani) आणि आलिया भट्टचा (Alia Bhatt) ब्रायडल लूक कॉपी केला आहे, असे काही अनेकांचे मत आहे. आता या परिणीतीच्या ब्रायडल लूकबाबत एका मुलाखतीमध्य तिची स्टायलिस्ट निधी अग्रवाल आणि श्रद्धा लखानी यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.
आलिया आणि कियारा यांनी त्यांच्या लग्नात पेस्टल कलरचा लेहंगा परिधान केला होता. दोघांनीही त्यांचा ब्रायडल लूक अगदी सिंपल ठेवला होता. त्यानंतर परिणीतीच्या ब्रायडल लूकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. तिचा ब्रायडल लूक हा आलिया आणि कियारा यांच्यासारखाच होता, असं काही नेटकऱ्यांचे मत आहे. त्यामुळे परिणीतीला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं.
काय म्हणाली स्टायलिस्ट?
परिणीतीची वेडिंग स्टायलिस्ट निधीनं सांगितलं,'मला वाटते की, कोणत्याही दोन वधू एकसारख्या दिसू शकत नाहीत. मी याबद्दल बायस नाहीये पण मला वैयक्तिकरित्या असे वाटते. मला वाटत नाही की, कोणतीही वधू इतर वधूच्या फोटोंचा संदर्भ घेत असेल कारण प्रत्येकजण वेगळे असतात. मला वाटते की, कोणत्याही वधूला तिच्या लूकसाठी ट्रोल करणे खूप चुकीचे आहे. जर मी हे फोटो पाहिले तर मला वाटत नाही की कोणी कॉपी करण्याचा प्रयत्न केला आहे.'
स्टायलिस्ट श्रद्धा म्हणाली, 'मला वाटतं, प्रत्येकाला लूकच्या मागची प्रोसेस समजत नाही. इंटरनेटवर एखाद्याला ट्रोल करणे सोपे आहे. मला वाटते की, एखाद्याचा लग्नाचा लूक तयार करण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते हे समजून घेतले पाहिजे.'
View this post on Instagram
उदयपूरमधील 'द लीला पॅलेस' येथे परिणीती आणि राघव यांचा शाही विवाहसोहळा पार पडला .पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, लोकप्रिय फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी परिणीती आणि राघव यांच्या विवाह सोहळ्याला हजेरी लावली होती.
इतर महत्वाच्या बातम्या: