Parineeti Chopra Raghav Chadha : 'आप' चे नेते राघव चढ्ढा आणि परिणीतीनं एकत्र पाहिली आयपीएल मॅच; फोटो व्हायरल, नेटकरी म्हणाले, 'जेव्हा राजकारण आणि बॉलिवूड....'
राघव चढ्ढा (Raghav Chadha) आणि परिणीती (Parineeti Chopra) हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून चर्चा सोशल मीडियावर होत आहे.

Parineeti Chopra Raghav Chadha : आम आदमी पक्षाचे नेते राघव चढ्ढा (Raghav Chadha) आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) हे बुधवारी (3 मे) मोहाली येथे पंजाब किंग्ज (Punjab Kings) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यातील आयपीएल 2023 (IPL 2023) चा सामना पाहताना दिसले. राघव चढ्ढा आणि परिणीती हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून चर्चा सोशल मीडियावर होत आहे. लवकरच हे दोघे लग्न करणार आहेत, असंही म्हटलं जात आहे. आता राघव चढ्ढा आणि परिणीतीचे मोहाली येथील स्टेडियममधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
नेटकऱ्यांनी शेअर केलं ट्वीट
एका नेटकऱ्यानं ट्विटरवर मोहाली स्टेडियममधील राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्रा यांचा फोटो शेअर केली. या फोटोमध्ये राघव चढ्ढा आणि परिणीती हे दोघेही मॅच पाहताना दिसत आहेत. या ट्वीटमध्ये त्या युजरनं लिहिलं, 'जेव्हा राजकारण आणि बॉलिवूड एकमेकांना भेटतात... राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्रा मोहाली स्टेडियम येथे एकत्र मॅच पाहिली.' तर दुसऱ्या नेटकऱ्यानं ट्वीटमध्ये लिहिलं, 'म्हणजे राघव चड्डा हे परिणीतीला डेट करत आहेत?'
Parineeti Chopra and AAP leader Raghav Chadda on a match date today.#PBKSvMI #Ipl2023 pic.twitter.com/Tt6d4ePyTq
— Himanshu Pareek (@Sports_Himanshu) May 3, 2023
When Politics meets Bollywood
— Siddharth (@ethicalsid) May 3, 2023
Raghav Chadha and Parineeti Chopra spotted enjoying a game together at the Mohali Stadium#PBKSvMI pic.twitter.com/YWJd47M6yT
So this raghav chadda is officially dating parineeti then pic.twitter.com/zAkjLugIjX
— Arib 🦷 (KKR 💜) (@los_pollosss) May 3, 2023
राघव चढ्ढा आणि परिणीती यांच्या नात्याबाबत गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चा होत आहे. दोघांनीही त्यांच्या नात्याबाबत अजून कोणतीही माहिती दिलेली नाही. आम आदमी पार्टीचे (Aam Aadmi Party) खासदार संजीव अरोरा यांनी काही दिवसांपूर्वी एक ट्वीट शेअर केले. या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं, 'मी परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांचे मनापासून अभिनंदन करतो. तुम्ही आनंदी राहा. तुम्हाला शुभेच्छा.' संजीव अरोरा यांच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले होते.
डेटिंगच्या चर्चेबाबत काही दिवसांपूर्वी राघव चढ्ढा यांना विचारण्यात आलं. त्यावेळी आपचे नेते राघव चढ्ढा यांनी एबीपी न्युजला सांगितलं, 'मला राजकारणाबाबत विचारा, परिणीतीबाबत नाही.'
संबंधित बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
