एक्स्प्लोर

Paresh Rawal : दररोज पोट भरणंही होतं अवघड, खर्चासाठी घ्यायचा प्रेयसीकडून पैसे; आज बॉलिवूडमध्ये मोठा दबदबा!

Paresh Rawal : परेश रावल यांच्या करिअरच्या कॅनव्हासमध्येही अनेक रंगाच्या व्यक्तीरेखांचा समावेश आहे. हिंदीशिवाय गुजराती, तेलगू चित्रपटात त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. 

Paresh Rawal : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते परेश रावल (Paresh Rawal) आज आपला 68 वा वाढदिवस साजरा करत आहेत. परेश रावल यांचा जन्म 30 मे 1955 रोजी मुंबईत झाला. परेशन रावल यांनी बॉलीवूड चित्रपटांमध्ये सर्व प्रकारच्या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. करिअरच्या सुरुवातीच्या काळात परेश रावल यांनी खलनायकी भूमिका साकारली होती. त्यानंतर विनोदी धाटणीच्या भूमिकांनी त्यांना प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळवले. 

बॉलिवूडमधील अनेक उत्तमोत्तम चित्रपटांचा भाग असलेल्या परेश रावल यांनी रंगभूमी, चित्रपटसृष्टी ते राजकारण असा प्रवास केला. परेश रावल यांनी 1984 मधील होली या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.  परेश रावल यांच्या करिअरच्या कॅनव्हासमध्येही अनेक रंगाच्या व्यक्तीरेखांचा समावेश आहे. हिंदीशिवाय गुजराती, तेलगू चित्रपटात त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. 

सिनेजगतामध्ये आज चतुरस्त्र  अभिनेते म्हणून ओळखले जाणारे परेश रावल हे  कधीकाळी आपल्या दैनंदिन खर्चासाठी प्रेयसीकडून पैसे उधार घेत होते. 

प्रेयसीकडून घ्यायचे पैसे... 

240 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलेल्या परेश रावल यांनी एका शोमध्ये आपण स्ट्रगलच्या दिवसांत आपल्या प्रेयसीकडून पैसे घेत होतो असे सांगितले. आमच्या कुटुंबात पॉकेटमनी ही संकल्पनाच नव्हती असेही त्यांनी सांगितले. अशा परिस्थितीत उदरनिर्वाहासाठी परेश बँकेत नोकरी करू लागलो होतो. 

परेश रावल यांनी सांगितले की, एका बँकेत मला दीड महिन्यासाठी नोकरी मिळाली होती. मात्र, ही नोकरी अवघ्या तीन दिवसात सोडली. त्यामुळे खर्चाचा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा त्याची मैत्रीण संपत स्वरूप त्याला मदत करायची. संपत या परेशला पैसे द्यायचा. परेश रावल यांची त्यावेळची प्रेयसी आणि आताची पत्नी संपत स्वरुप यांनी 1979 मध्ये मिस इंडियाचा खिताब जिंकला होता. त्याशिवाय, त्या अभिनेत्रीदेखील आहेत. 

संपत स्वरुपसोबत विवाहबद्ध... 

आपल्या स्ट्रगलच्या काळात  साथ देणाऱ्या संपत स्वरुपसोबत परेश रावल विवाहबद्ध झाले. संपत आणि परेश रावल यांनी 1987 मध्ये लग्नगाठ बांधली. त्या आधी दोघेही एकमेकांना जवळपास 12 वर्ष डेट करत होते.  त्यांना आदित्य आणि अनिरुद्ध अशी दोन मुले आहेत. 

पुरस्काररुपी कौतुकाची थाप... 

परेश रावल यांना त्यांच्या दमदार अभिनयासाठी आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत. 1994 मध्ये परेश रावल यांनी 'वो छोकरी' या चित्रपटात काम केले. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. 'हेरा फेरी' हा त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट कॉमेडियनचा फिल्मफेअर पुरस्कार देण्यात आला. याआधी 1993 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'सर' या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट खलनायकाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. 2003 मध्ये त्यांना पुन्हा एकदा सर्वोत्कृष्ट कॉमेडियनसाठी फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 'आवारा पागल दिवाना'साठी त्यांना हा पुरस्कार मिळाला. 2014 हे वर्ष परेश रावल यांच्यासाठी खूप खास होते. त्याच वर्षी त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

खलनायकी भूमिकेने सुरुवात... 

परेशने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात 'नसीब नी बलिहारी' (1982) या गुजराती चित्रपटातून केली. आमिर खान-मीरा नायरचा 'होळी' (1984) हा त्यांचा  पहिला हिंदी चित्रपट होता. सनी देओलच्या अर्जुन (1985) या चित्रपटातील भूमिकेने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.  यानंतर परेश यांनी संजय दत्तच्या 'नाम' (1986) या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेतून खूप चर्चेत आले. पुढील काही वर्षांमध्ये, परेश यांनी डाकू, कबजा, राम लखन, स्वर्ग, झुल्म की हुकूमत आणि दामिनी, दौड, यांसारख्या चित्रपटांमध्ये मुख्य खलनायक, ग्रे-शेडेड कॅरेक्टर किंवा खलनायकाच्या गटातील भूमिका साकारली होती. त्यानंतर परेश रावल यांनी खलनायकी भूमिकेच्या चौकटीतून बाहेर पडले. 

विनोदी भूमिकेत धमाल...

1994 मध्ये परेश रावल यांनी 'अंदाज अपना अपना' या चित्रपटात दुहेरी भूमिका साकारली होती. यात खलनायक श्याम बजाज अर्थात तेजाचीदेखील भूमिका होती. अंदाज अपना अपनाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नसली तरी परेश रावल यांच्या भूमिकेने धमाल आणली होती. कॉमेडी साईडकिक म्हणून त्यांना काही चित्रपटात भूमिका मिळाल्या. यामध्ये, मोहरा, हिरो नंबर 1, जुदाई, मिस्टर अँड मिसेस खिलाडी आणि इतर अनेक हिट चित्रपटांसह अनेक चित्रपट केले. या टप्प्यात, तिने महेश भट्टच्या तमन्नामध्ये एका षंढाची भूमिका केली आणि 'गुप्त: द हिडन ट्रुथ'मध्ये ग्रे-शेडेड पात्रही साकारले.

परेश रावल यांच्या संस्मरणीय भूमिका... 

परेश रावल यांनी साकारलेल्या भूमिका लक्षवेधी ठरल्या. केतन मेहता यांच्या सरदार या चित्रपटात त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांची भूमिका साकारली होती. त्याशिवाय, हेरा फेरी चित्रपटातील बाबूराव गणपतराव आपटे ही विनोदी ढंगाची भूमिकाही प्रेक्षकांच्या लक्षात राहिली. परेश रावल यांनी प्रियदर्शन यांच्या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली. 'ओएमजी: ओह माय गॉड' या चित्रपटात त्यांनी मुख्य भूमिका साकारली. तर, टेबल नं. 21 मध्ये ग्रे-शेड भूमिका साकारली. 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MIDC Manhole Death Special Report : धोधो पावसात मॅनहोलने घेतला बळी, जबाबदार  कोण?Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?Zero Hour Malvan Statue : मालवणमधील शिवरायांचा पुतळा कसा कोसळला? कारणं काय? आरोपी नेमकं कोण?Zero Hour Case Guest Center : संजय राऊतांवर अब्रुनुकसाना खटला दाखल करण्याची गरज होतीच - दमानिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
Embed widget