Pankaj Udhas : पंकज उधास यांच्या पार्थिवावर आज होणार अंत्यसंस्कार; कधी आणि कुठे दिला जाणार अखेरचा निरोप?
Pankaj Udhas : पंकज उधास यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
Pankaj Udhas : सुप्रसिद्ध पंकज उधास (Pankaj Udhas) यांनी सोमवारी 72 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. आपल्या जादूई आवाजाने रसिकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या पंकज उधास यांना आज अखेरचा निरोप दिला जाणार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार आहे. त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात उपचार सुरू होते.त्या दरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली.
आज होणार पंचत्वात विलीन
पंकज उधास यांच्या निधनाच्या वृत्ताने संगीतप्रेमी आणि सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त करण्यात आली. अनेकांनी पंकज उधास यांच्या आठवणींना उजाळा दिला. पंकज उधास यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यापूर्वी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. आज, 27 फेब्रुवारी रोदी दुपारी 3 ते 5 वाजण्याच्या दरम्यान वरळी हिंदू स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
View this post on Instagram
पीएम मोदींनी शोक व्यक्त केला
एकीकडे पंकज उधास यांच्या निधनाने बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. तर दुसरीकडे राजकीय जगतातील दिग्गजांनीही गायक यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर त्यांच्यासोबतचे काही फोटो शेअर करून पंकज उधास यांना श्रद्धांजली वाहिली. 'पंकज उधास जी यांच्या निधनावर आम्ही शोक व्यक्त करतो, ज्यांच्या गायनाने अनेक भावना व्यक्त केल्या असल्याचे पंतप्रधानांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले.
We mourn the loss of Pankaj Udhas Ji, whose singing conveyed a range of emotions and whose Ghazals spoke directly to the soul. He was a beacon of Indian music, whose melodies transcended generations. I recall my various interactions with him over the years.
— Narendra Modi (@narendramodi) February 26, 2024
His departure leaves… pic.twitter.com/5xL6Y3Sv75
गझल गायक म्हणून यश मिळवल्यानंतर, महेश भट्ट यांच्या नाम या चित्रपटात पंकज उधास दिसले होते. चिठ्ठी आयी है या गाण्यातून पंकज उधास घराघरात पोहचले. त्यानंतर अनेक हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले. जगभरातील अल्बम आणि लाइव्ह कॉन्सर्टमुळे त्यांना गायक म्हणून प्रसिद्धी मिळाली. 2006 मध्ये संगीत क्षेत्रातील योगदानासाठी पंकज उधास यांना पद्मश्री या भारतातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवण्यात आले.