Pankaj Udhas Passed Away : मद्यप्रेमींच्या मैफलीत रंग भरले; पंकज उदास यांची 'ही' गाणी करतात सोबत!
Pankaj Udhas Passed Away : पंकज यांनी आपल्या काही गीतांमधून त्यांनी मद्य प्रेमींना मद्य कसे घ्यायचे याचे 'धडे' दिले. पंकज उधास यांच्या गीतात मद्य कोण याचाही उलगडा गीतांमधून होतो.
Pankaj Udhas Passed Away : प्रेमाची उत्कट भावना असो वा किंवा विरह असो किंवा प्रेयसीच्या सौंदर्यांचे कौतुक... पंकज उधास (Pankaj Udhas) यांच्या स्वरांनी प्रेमात असलेल्या तरुणाईच्या भावना शब्दातून अशा व्यक्त केल्याकी प्रत्येकाला त्या भावना आपल्याच वाटू लागल्या. पंकज उधास यांनी फक्त तरुणाई, प्रेमीयुगुल यांनाच नव्हे तर मद्यप्रेमी असलेल्यांच्या मैफलीतही रंग भरले. पंकज यांनी आपल्या काही गीतांमधून त्यांनी मद्य प्रेमींना मद्य कसे घ्यायचे याचे 'धडे' दिले. पंकज उधास यांच्या गीतात मद्य कोण याचाही उलगडा गीतांमधून होतो.
पंकज उधास यांनी आपल्या गीतात कधी आयुष्यावरील प्रेमाला मद्य म्हणा... कधी प्रेयसीच्या डोळ्यातील भाव मद्यासारखे असल्याचे पंकज उधास यांनी सांगितले.
View this post on Instagram
पंकज उधास यांची काही गझल, गाणी...
>> एक तरफ उसका घर, एक तरफ मयकदा
पंकज उधास यांची ही लोकप्रिय गझल खूपच जुनी आहे. आजही ही गझल लोकप्रिय आहे.
थोडी-थोडी पिया करो...
पंकज उधास यांची ही गझल खूपच लोकप्रिय आहे. पंकज उधास यांच्या या गझलचे मद्य प्रेमींमध्ये एक वेगळेच स्थान आहे. ही गझल आजही आवडीने ऐकली जाते. विशेषत: मद्य प्रेमींची बैठक असेल तेव्हा त्या मैफलीत ही गझल रंग भरते.
शराब चीज ही ऐसी है...
मद्य रसिकांचीही ही गझल चांगलीच पसंतीस उतरली. ही गझल 1984 मध्ये रिलीज झाली होती. ही गझलही चांगलीच लोकप्रिय ठरली. या गझलमध्ये पंकज उदास मद्याचा अर्थ सांगितला. आपली प्रेयसी आणि मद्य यांच्यावर ही गझल बेतली.
न समझो कि हम पी गए पीते-पीते- या अल्बमचे नाव नशा आहे. वर्ष 1997 मध्ये हा अल्बम प्रदर्शित झाला होता. त्यावेळी मद्य प्रेमींच्या प्लेलिस्टमध्ये या गझलला स्थान असायचे.
इतर संबंधित बातमी :
(Disclaimer : मद्यपान करणे हे आरोग्यास हानिकारक आहे. ही बातमी वाचकांच्या माहितीसाठी आहे. यातून मद्यपान करण्यास प्रोत्साहन देण्याचा अथवा त्याचे समर्थन करण्याचा कोणताही हेतू नाही.)