एक्स्प्लोर
महिला कुस्तीपटूचं चॅलेंज राखीला महागात, रिंगमधून थेट रुग्णालयात
महिला कुस्तीपटू रोबेल रिंगमध्ये येताच तिने पंचकुलाच्या महिलांना मुकाबल्यासाठी आव्हान दिलं. यानंतर रोबेलचं आव्हान स्वीकारत राखी सावंत रिंगमध्ये गेली.
![महिला कुस्तीपटूचं चॅलेंज राखीला महागात, रिंगमधून थेट रुग्णालयात Panchkula : Wrestler throws Rakhi Sawant on ring floor महिला कुस्तीपटूचं चॅलेंज राखीला महागात, रिंगमधून थेट रुग्णालयात](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/11/12120350/rakhi-sawant_Wrestler.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पंचकुला (हरियाणा) : अभिनेत्री राखी सावंत चर्चेत राहण्यासाठी दररोज काही ना काही ड्रामा करतच असते. यावेळी एका कुस्तीपटूचं चॅलेंज स्वीकारणं तिला चांगलंच महागात पडलं. रेसलिंग रिंगमधून थेट रुग्णालयात जाण्याची वेळ राखीवर ओढावली. पंचकुलातील ताऊदेवी लाल स्टेडियममध्ये ग्रेट खली आयोजित रेसलिंग शोमध्ये राखीला दुखापत झाल्याचं कळतं.
सीडब्लूई चॅम्पियनशिप पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती. द ग्रेट खलीसह अनेक प्रसिद्ध कुस्तीपटू उपस्थित होते. यावेळी महिला कुस्तीपटू रोबेल रिंगमध्ये येताच तिने पंचकुलाच्या महिलांना मुकाबल्यासाठी आव्हान दिलं. यानंतर रोबेलचं आव्हान स्वीकारत राखी सावंत रिंगमध्ये गेली. आधी माझं डान्सचं आव्हान पूर्ण कर, असं राखी रोबेलला म्हणाली. आव्हानानुसार, रोबेलने एका गाण्यावर राखीसोबत डान्स केला. गाणं संपल्यावर रोबेलने राखीला खांद्यावर उचललं आणि खाली आपटलं. यानंतर राखी सावंत जखमी झाली.
5 ते 8 मिनिटं राखी सावंत रिंगमध्ये वेदनेने कळवळत होती. सुरुवातीला प्रेक्षकांना आणि सीडब्लूई चॅम्पियशनपच्या कर्मचाऱ्यांना काही समजलंच नाही. राखीला दुखापत झाल्याचं समजल्यानंतर तिला जीरकपूरच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
Wrestler throws #RakhiSawant on ring floor, admitted in #hospital Hor lavo pangey!! Courtesy- @patialapolitics pic.twitter.com/8trTbYqGdJ
— ☬ SINGH ਸਿੰਘ ☬ 🇮🇳 (@HatindersinghR) November 12, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्राईम
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)