(Source: ECI/ABP News/ABP Majha)
OTT Releases This Week: प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी; वीकेंडला ओटीटीवर घरबसल्या पाहा 'हे' चित्रपट आणि वेब सीरिज
OTT Releases This Week: या आठवड्यात अनेक चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) ओटीटीवर रिलीज होणार आहेत.
OTT Releases This Week: ऑक्टोबर (October) महिन्याचा दुसरा आठवडा हा प्रेक्षकांसाठी खास असणार आहे. कारण या आठवड्यात अनेक चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) ओटीटीवर (OTT) रिलीज होणार आहेत. या आठवड्यार रिलीज होणारे चित्रपट आणि वेब सीरिज तुम्ही वीकेंडला ( Weekend) घरबसल्या ओटीटीवर पाहू शकता.
मथगम पार्ट-2 (Mathagam Part 2)
मथगम पार्ट-2 ही वेब सीरिज डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. या वेब सीरिजमध्ये गौतम वासुदेव मेनन, निखिला विमल, धिव्यदर्शिनी, दिलनाझ इराणी, इलावरासू, वादिवुक्करासी, अरुवी थिरुनावुकारासू, मुन्नार रमेश, शरथ रवी, ऋषिकांत, मुरली अब्बास आणि सिझर मनोहर यांच्यासोबत अथर्व आणि के मणिकंदन यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. ही वेब सीरज 10 ऑक्टोबर रोजी ओटीटीवर रिलीज होत आहे.
मार्क अँटनी (Mark Antony)
मार्क अँटनी हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होत आहे, तुम्ही हा चित्रपट वीकेंडला घरबसल्या पाहू शकता. रितू वर्मा, सेल्वाराघवन, सुनील आणि अभिनय, विशाल, एसजे सूर्या, या कलाकारांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. हा चित्रपट 13 ऑक्टोबर रोजी अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवरुन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
View this post on Instagram
सुलतान ऑफ दिल्ली (Sultan Of Delhi)
अर्जुन भाटिया यावर पात्रावर सुलतान ऑफ दिल्ली या वेब सीरिजची कथा आधारित आहे.जो दिल्लीतील सर्वात मोठ्या अवैध शस्त्र विक्रेत्यांसोबत काम असतो.सुलतान ऑफ दिल्ली या वेब सीरिजमध्ये ताहिर राज भसीन, अंजुम्म शर्मा, विनय पाठक आणि निशांत दहिया यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ही सीरिज 13 ऑक्टोबर रोजी डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होत आहे.
View this post on Instagram
कासारगोल्ड (Kasargold)
आसिफ अली, सनी वेन आणि विनायकन यांची प्रमुख भूमिका असणारा कासारगोल्ड हा चित्रपट 13 ऑक्टोबर रोजी नेटफ्लिक्स (Netflix) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीडज होत आहे.
महत्वाच्या इतर बातम्या :