एक्स्प्लोर
VIDEO : सई आणि प्रियाच्या 'वजनदार'चा ट्रेलर रिलीज
मुंबई : ग्लॅमरस अभिनेत्री सई ताम्हणकर आणि प्रिया बापट यांची मुख्य भूमिका असलेल्या 'वजनदार' सिनेमाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे.
सचिन कुंडलकरने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. बारीक होण्याची इच्छा असणाऱ्या दोन वजनदार स्त्रियांची गोष्ट यात रेखाटण्यात आली आहे. त्यांचं बारीक होण्याचं हे मिशन कशा पद्धतीने पुढे सरकतं आणि कोणते ट्विस्ट अँड टर्न्स येतात हे सारं 'वजनदार' या सिनेमात पाहायला मिळेल.
सई ताम्हणकर आणि प्रिया बापट यांनी खास या भूमिकांसाठी वजन वाढवलं आहे. त्या किती 'वजनदार' झाल्या आहेत, ते या ट्रेलरमधून दिसतं आहे.
सिनेमात सई, प्रियासोबत सिद्धार्थ चांदेकर, चेतन चिटणीस यांच्या भूमिका आहेत. तर क्रिकेटपटू संदीप पाटील यांचा मुलगा चिराग पाटील या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे.
11 नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.
पाहा ट्रेलर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
रत्नागिरी
क्रीडा
मुंबई
महाराष्ट्र
Advertisement