एक्स्प्लोर
'फोर्स 2' मध्ये 'मिस्टर इंडिया'तील गाण्याचं नवं व्हर्जन
मुंबईः 'मिस्टर इंडिया' सिनेमातील 'कांटे नहीं कटते' हे गाणं अभिनेता जॉन अब्राहमच्या 'फोर्स 2' मध्ये 'ओ जानिया'च्या रुपात सादर करण्यात आलं आहे. या गाण्यात अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने अफलातून डान्स केला आहे.
श्रीदेवीच्या डान्सला रिप्लेस करण्याची आपली इच्छा नाही. श्रीदेवीचं 'कांटे नहीं कटते' हे गाणं आजही अनेकांसाठी उदाहरण आहे. त्यामुळे त्या गाण्यापर्यंत कुणीही जाऊ शकत नाही. मात्र आम्ही या गाण्याला आजच्या पिढीसोबत जुळवलं आहे, असं सोनाक्षी म्हणाली.
'फोर्स 2' 18 नोव्हेंबरला रिलीज होत आहे. या सिनेमात निर्माता आणि अभिनेता जॉन मुख्य भूमिकेत आहे. तर सिनेमाचं दिग्दर्शन अभिनव देव यांनी केलं आहे.
पाहा गाण्याचा व्हिडिओः
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement