![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Nitin Desai Last Rituals : नितीन देसाई अनंतात विलीन; एन.डी. स्टुडिओमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Nitin Desai : कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
LIVE
![Nitin Desai Last Rituals : नितीन देसाई अनंतात विलीन; एन.डी. स्टुडिओमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार Nitin Desai Last Rituals : नितीन देसाई अनंतात विलीन; एन.डी. स्टुडिओमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/04/12524bb15354d3f85a00ef8a8fc9f66b1691120448379254_original.png)
Background
Nitin Desai : कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांनी आत्महत्या केली आहे. त्यांनी कर्जतमधील एनडी स्टुडीओमध्ये गळफास घेत आयुष्य संपवलं आहे. देसाईंच्या आत्महत्येनं हिंदी आणि मराठी सिनेसृष्टी हादरली आहे. वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी आयुष्य संपवलं आहे. नितीन देसाई हे लोकप्रिय कलादिग्दर्शक असण्यासोबत निर्माता दिग्दर्शक आणि अभिनेतेदेखील होते.
नितीन देसाई यांनी अनेक सुपरहिट हिंदी सिनेमांचे सेट उभारले होते.'1942 अ लव्ह स्टोरी', 'हम दिल दे चुके सनम', 'माचिस', 'देवदास', 'लगान', 'जोधा अकबर' या सुपरहिट सिनेमाचं त्यांनी कला दिग्दर्शन केलं होतं. नितिन देसाई हे मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतलं मोठं नाव होतं.
एनडी स्टुडीओ हे नितीन देसाई यांचं दुसरं घरच होतं. आत्महत्येच्या दोन दिवसांपासून ते स्टुडीओमध्येच होते. कालपर्यंत आपल्या टीमला त्यांनी येणाऱ्या प्रोजेक्टबद्दल माहिती दिली होती. पण आज सकाळपासूनच त्यांनी कोणाचाही कॉल उचलला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी एनडी स्टुडीओच्या अधिकाऱ्यांना याबद्दल कळवलं. त्यानंतर त्यांनी दरवाजा तोडला आणि पोलिसांना याबद्दल माहिती दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते महाराष्ट्रातील सर्व राजकारण्यांपर्यंत नितीन देसाई यांचे चांगले संबंध होते. नितीन देसाई हे इंडस्ट्रीतलं मोठं नाव आहे. 80 च्या दशकात नितीन देसाई यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. '1942 अ लव्ह स्टोरी' या सिनेमाने नितीन देसाई यांना खऱ्या अर्थाने ब्रेक मिळाला होता. पुढे अनेक लोकप्रिय दिग्दर्शकांसोबत त्यांनी काम केलं.
नितीन देसाई यांनी शुन्यातून स्वर्ग निर्माण केला आहे. त्यांनी त्यांचं स्वप्न साकार केलं होतं. कला दिग्दर्शन सारख्या वेगळ्या क्षेत्रात नितीन देसाई यांनी मोलाचं काम केलं आहे. गेल्या 30 वर्षांतल्या अनेक सिनेमांच्या कलादिग्दर्शनाची धुरा नितीन देसाई यांनी सांभाळली आहे. वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमे त्यांनी केले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्यक्तिगत संबंध असलेले नितीन देसाई!
नितीन देसाई यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्यक्तिगत संबंध होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री असताना मुंबईत आले होते तेव्हा कमळातून मोदींना भाजपाच्या कार्यकत्यांसमोर पेश केलं गेलं होतं ती कल्पनाही नितीन देसाई यांची होती. त्यानंतर नरेंद्र मोदी नितीन देसाई यांच्या प्रेमातच पडले.
सिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांनी आत्महत्या केली आहे. त्यांच्या आत्महत्येनं हिंदी आणि मराठी सिनेसृष्टी हादरली आहे. नितीन देसाई यांनी वयाच्या 58 व्या वर्षी आयुष्य संपवलं आहे. नितीन देसाई यांच्या आत्महत्येनं मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली असून अनेक सेलिब्रिटींनी शोक व्यक्त केला आहे.
Nitin Desai : असा नितीन दादा पुन्हा होने नाही : रवी जाधव
Nitin Desai : नितीन देसाई यांच्याबद्दल बोलताना लोकप्रिय सिने-दिग्दर्शक रवी जाधव म्हणाले,"नितीन देसाई यांच्या निधनाची बातमी खूप धक्कादायक होती. माझ्यासारख्या अनेक मध्यम वर्गीय मुलांना ते आदर्श होते. या गोष्टी मागे कोणती काय कारणे आहेत मला माहिती नाही. दोन महिन्यापूर्वी आमचं बोलणं झालं होतं. असा नितीन दादा पुन्हा होने नाही.
Nitin Desai : मराठी मनोरंजनसृष्टीतील मंडळींनी घेतलं नितीन देसाई यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन
Nitin Desai : मराठी मनोरंजनसृष्टीतील मंडळींनी नितीन देसाई यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं आहे. मराठी सिने सृष्टीतील सुबोध भावे, मानसी नाईक, निखिल साने आले आहेत.
Nitin Desai : नितीन देसाई यांचे पार्थिव जोधा अकबर सिनेमाच्या सेटवर अंतिमदर्शनासाठी ठेवण्यात आलं
Nitin Desai : नितीन देसाई यांचे पार्थिव जोधा अकबर सिनेमाच्या सेटवर अंतिमदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे.
Nitin Desai : नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी आज गुन्हा दाखल होण्याची शक्यता; एडलवाईज कंपनीकडून मानसिक त्रास दिला गेल्याचा आरोप
Nitin Desai : प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांनी आत्महत्या केली असून त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या आत्महत्येप्रकरणी आज गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. एडलवाईज कंपनीकडून मानसिक त्रास दिला गेल्याचा आरोप आहे.
Nitin Desai : नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी आज गुन्हा दाखल होण्याची शक्यता
Nitin Desai : प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांनी आत्महत्या केली असून त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या आत्महत्येप्रकरणी आज गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. एडलवाईज कंपनीकडून मानसिक त्रास दिला गेल्याचा आरोप आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)