Netflix Crime Web Series: 'द फेम गेम' ते 'जामतारा'; नेटफ्लिक्सवरील 'या' क्राईम थ्रिलर वेब सीरीज नक्की पाहा
नेटफ्लिक्स (Netflix) या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील काही क्राईम थ्रिलर वेब सीरीज रिलीज झाल्या. या सीरिज तुम्ही घरबसल्या पाहू शकता.
![Netflix Crime Web Series: 'द फेम गेम' ते 'जामतारा'; नेटफ्लिक्सवरील 'या' क्राईम थ्रिलर वेब सीरीज नक्की पाहा Netflix Crime web series the fame game to jamtara best crime thriller web series on netflix ott platform Netflix Crime Web Series: 'द फेम गेम' ते 'जामतारा'; नेटफ्लिक्सवरील 'या' क्राईम थ्रिलर वेब सीरीज नक्की पाहा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/29/b3bb5ec2f17e287820675d3beb2ff4361680056492335259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
The Best Crime Thriller Web Series On Netflix: ओटीटी प्लेटफॉर्मवरील (OTT Platform) विविध विषयांवर आधारित असणाऱ्या वेब सीरिज (Web Series) आणि चित्रपटांना (Movie) प्रेक्षकांची पसंती मिळते. वेब सीरिज आणि चित्रपट प्रेक्षक वीकेंडला घरबसल्या ओटीटीवर पाहू शकतात. नेटफ्लिक्स (Netflix) या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील काही क्राईम थ्रिलर वेब सीरीज रिलीज झाल्या. या सीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळाली. जर तुम्हाला क्राईम थ्रिलर वेब सीरीज बघण्याची आवड असेल तर तुम्ही या सीरिज पाहू शकता...
द फेम गेम (The Fame Game)
द फेम गेम या क्राईम थ्रिलर वेब सीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या सीरिजमध्ये बॉलिवूडमधील धक-धक गर्ल माधुरी दीक्षितचे प्रमुख भूमिका साकारली आहे. IMDb ने या सीरिजला 6.8 रेटिंग दिले.
सेक्रेड गेम्स (Sacred Games)
IMDb कडून 8.5 रेटिंग मिळालेल्या सेक्रेड गेम्स या क्राईम थ्रिलर सीरिजनं प्रेक्षकांची पसंती मिळाली. अनुराग कश्यपसह या सीरिजचं दिग्दर्शन केलं असून नवाज़ुद्दीन सिद्दीकीनं यात प्रमुख भूमिका साकारली आहे. या वेब सीरिजमध्ये अभिनेता सैफ अली खाननं देखील महत्वाची भूमिका साकारली.
जामतारा: सबका नंबर आएगा (Jamtara: Sabka Number Ayega)
जामतारा ही क्राईम-थ्रिलर सीरिज नेटफ्लिक्सवरील लोकप्रिय वेब सीरिजपैकी एक मानली जाते. या सीरिजच्या कथानकाला आणि सीरिजमधील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.
दिल्ली क्राईम (Delhi Crime)
अॅक्शन, क्राईम आणि सस्पेन्स असलेल्या दिल्ली क्राईम या वेब सीरिजला IMDb नं या सीरिजला 8.5 रेटिंग मिळालं आहे. या सीरिजचे दोन भाग प्रेक्षकांच्या भेटीस आले. रसिका दुग्गल, राजेश तेलांग यांनी या सीरिजमध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. या सीरिजमधील अभिनेत्री शेफाली शाहच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.
माई (Mai)
क्राईम-थ्रिलर सीरिज आवडतात ते साक्षी तन्वरची माई ही वेब सीरिज बघू शकतात . या सीरिजमध्ये एका आईची कथा दाखवण्यात आली आहे, जिच्या मुलीचा खून होतो. मुलीच्या खुनाचा बदला ती कसा घेते? हे माई या वेब सीरिजमध्ये दाखवण्यात आलं आहे.
मनी हाईस्ट (Money Heist)
मनी हाईस्ट या वेब सीरिजला IMDb कडून 8.2 रेटिंग मिळाले आहे, ही देखील अॅक्शन वेब सीरिज आहे. या सीरिजमध्ये काही पोलीस आणि चोर यांच्यातील चकमक दाखवण्यात आली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)