Netfix February 2023 : फेब्रुवारीत नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी; कोणते सिनेमे अन् वेबसीरिज होणार प्रदर्शित?
Netflix : नेटफ्लिक्ससाठी 2023 हे वर्ष खूपच खास असणार आहे. येत्या फेब्रुवारी महिन्यात अनेक दर्जेदार सिनेमे आणि वेबसीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहेत.
Netflix February 2023 Release : सिनेमे (Movies) आणि वेबसीरिजची (Web Series) आवड असणाऱ्यांसाठी फेब्रुवारी (February) महिना खूपच खास असणार आहे. या महिन्यात प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. या महिन्यात नेटफ्लिक्सवर (Netflix) कोणते सिनेमे आणि वेबसीरिज प्रदर्शित होणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. तर गुंथर मिलियनपासून (Gunther Millions) पासून ते 'लव्ह टू हेट यू' (Love to Hate You) पर्यंत अनेक वेबसीरिज आणि सिनेमांचा यात समावेश आहे.
गुंथर मिलियन (Gunther Millions)
कधी प्रदर्शित होणार? 1 फेब्रुवारी
'गुंथर मिलियन' (Gunther Millions) ही वेबसीरिज एका श्रीमंत कुत्र्याच्या आयुष्यावर भाष्य करणारी आहे. मालकाने आपली सर्व मालमत्ता लाडक्या कुत्र्याच्या नावावर केली आहे. त्यामुळे मालकामुळे कुत्र्याकडे अचानक खूप पैसा आला आहे. ही सीरिज प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासोबत त्यांना भावूकदेखील करेल. ही वेबसीरिज प्रेक्षक 1 फेब्रुवारीपासून नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकतात.
फ्रीरिज (Freeridge)
कधी प्रदर्शित होणार? 2 फेब्रुवारी
'फ्रीरिज' (Freeridge) ही वेबसीरिज खास तरुणांसाठी आहे. तरुणांच्या आयुष्यात येणार चढ-उतार या वेबसीरिजमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. ही वेबसीरिज 2 फेब्रुवारीला नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
क्लास (Class)
कधी प्रदर्शित होणार? 3 फेब्रुवारी
दिल्लीतील एका पॉश इंटरनॅशनल शाळेत प्रवेश मिळवणाऱ्या तीन मध्यमवर्गीय मुलांची गोष्ट 'क्लास' (Class) या सीरिजमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. इंटरनॅशनल शाळेत प्रवेश केल्यानंतर मुलांच्या आयुष्यात काय बदल घडतात हे या सीरिजमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ही सीरिज 3 फेब्रुवारीपासून प्रेक्षक नेटफ्लिक्सवर पाहू शकतात.
ट्रू स्परिट (True Spirit)
कधी प्रदर्शित होणार? 3 फेब्रुवारी
'ट्रू स्परिट' हा सिनेमा एका सत्य घटनेवर आधारित आहे. नेटफ्लिक्सच्या या सिनेमाची निर्मिती डेबरा मार्टिन चेन्ज आणि मार्टिन चेन्ज प्रोडक्शनच्या बॅनरखाली करण्यात आली आहे. ही वेबसीरिज 3 फेब्रुवारीला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
विनलॅंड सागा 2 (Vinland Saga 2)
कधी प्रदर्शित होणार? 6 फेब्रुवारी
'विनलॅंड सागा' ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. तेव्हापासून प्रेक्षक या सीरिजच्या दुसऱ्या पर्वाची प्रतीक्षा करत होते. आता या बहुचर्चित वेबसीरिजचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहे. ही वेबसीरिज प्रेक्षक 6 फेब्रुवारीपासून नेटफ्लिक्सवर पाहू शकतात.
बिल रसेल : लीजेंड (Bill Russell Legend)
कधी प्रदर्शित होणार? 8 फेब्रुवारी
'बिल रसेल : लीजेंड' हा सिनेमा ब्रिटिश लेखक, तत्त्वज्ञ, इतिहासकार आणि गणितज्ञ बिल रसेल यांच्या आयुष्यावर आधारित आहे. बिल रसेल यांना 1950 साली साहित्यातील नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. आता या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून हा सिनेमा 8 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
माय डॅड द बाउंटी हंटर (My Dad the Bounty Hunter)
कधी प्रदर्शित होणार? 9 फेब्रुवारी
'माय डॅड द बाउंटी हंटर' या कार्टून सीरिजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून चाहते आता या सीरिजची आतुरतेने वाट पाहत आहेत. या वेबसीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा अकादमी पुरस्कार विजेते एवरेट डाउनिंगने केलं आहे. ही सीरिज 9 फेब्रुवारीपासून प्रेक्षक नेटफ्लिक्सवर पाहू शकतात.
लव्ह टू हेट यू (Love to Hate You)
कधी प्रदर्शित होणार? 10 फेब्रवारी
'लव्ह टू हेट यू' (Love To Hate You) ही रोमॅंटिक कोरियन वेबसीरिज आहे. प्रेम आणि फसवणुक यावर भाष्य करणारी ही सीरिज आहे. येत्या 10 फेब्रुवारीपासून प्रेक्षक ही सीरिज नेटफ्लिक्सवर पाहू शकतात.
महत्त्वाच्या इतर बातम्या :