जिम सुरु झाल्याने नेहा शर्मा भलतीच खुश, वर्कआऊटच्या व्हिडीओला 14 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूव्ज
आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत चर्चेत राहणाऱ्या नेहा शर्माने तिचा वर्कआऊट करताना एक व्हिडीओ शेअर केला आहे. जिम सुरु झाल्याने अतिशय खुश झाल्याचं तिने सांगितलं. आतापर्यंत 14 लाखांपेक्षा अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.
मुंबई: कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे गेले कित्येक महिने अनेक लोकांना नाईलाजास्तव घरी राहावं लागलं होतं. आता हळूहळू गोष्टी पूर्वपदावर येत आहेत. कोरोनाच्या काळात जिम बंद असल्याने आपल्या फिटनेसवर जास्त लक्ष देणाऱ्या सेलिब्रिटींना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. बऱ्याच काळापर्यंत त्यांना म्हणावं तसं त्यांच्या फिटनेसकडे लक्ष देता आले नाही. शासनाने जिम सुरु करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ही मंडळी आता भलतीच खुश झाली आहेत. यावर अभिनेत्री नेहा शर्माने जिममध्ये वर्कआउट करतानाचा तिचा एक व्हिडीओ शेअर करुन आपला आनंद व्यक्त केला आहे.
नेहा शर्माने तिच्या इन्स्टाग्राम आणि ट्विटरवरील पोस्टमध्ये यासंबंधीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या पोस्टमध्ये तिने म्हटले आहे की, "शेवटी जिम खुल्या झाल्या यापेक्षा चांगले काय असू शकते. यामुळे शरीर आणि मन या दोघांनाही चांगला अनुभव येतोय. शरीर आणि मन या दोघांसाठी नेहमी अॅक्टिव राहा."
Gyms finally reopen and I couldn’t be more grateful..body feels better and so does the mind..stay active for both your mind and body...#fitnessmotivation #fitness #bemindful #stayhealthy pic.twitter.com/gvCiRxeCTb
— Neha Sharma (@Officialneha) November 9, 2020
सोशल मीडियावर या व्हिडीओची जोरदार चर्चा आहे. नेहाच्या चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकजण नेहाच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत. आतापर्यंत 14 लाखांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओ पाहिला आहे. त्यामध्ये नेहा वर्कआऊट करताना दिसत आहे.
अभिनेत्री नेहा शर्मा तिच्या ग्लॅमरस लूकमुळे सतत चर्चेत असते. सोशल मीडियातही ती कायम अॅक्टिव्ह असते. नेहा तिच्या आगामी 'आफत-ए-इश्क' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्या चित्रपटात इला अर्जुन, नमित दास, अमित सियाल हे तिचे सहकलाकार आहेत. 'आफत-ए-इश्क' हा चित्रपट 'लिझा द फॉक्स फेअरी' या प्रसिद्ध हंगेरियन चित्रपटावर आधारित आहे.
महत्वाच्या बातम्या:
PHOTO | जान्हवी कपूरचा रेट्रो लूक व्हायरल
तनुश्री दत्ताने 15 किलो वजन कमी केलं, बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्यासाठी सज्ज!
बॉलिवूडमध्ये नशीब आजमावण्यासाठी अर्ध्यातच सोडलं शिक्षण; त्यावेळी अशी दिसत होती दिशा पाटनी!
ड्रग्जप्रकरणी अर्जुन रामपालला एनसीबीचं समन्स, 11 नोव्हेंबरला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश