एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Neena Gupta Viral Video: बाई... काय प्रकार? सोनेरी डोळे... हिरवं तोंड; वयाच्या 65 व्या वर्षी 'गंजी चुडैल' बनलेल्या नीना गुप्तांना पाहून नेटकरी चक्रावले

Neena Gupta Ganji Chudail Viral Pics: बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री नीना गुप्ता हिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत. ज्यामध्ये त्यांचा लूक पाहून अंगावर थेट काटाच येतो.

Neena Gupta Viral Video: बॉलिवूडच्या (Bollywood Actress) अनेक गुणी अभिनेत्रींनी रुपेरी पडदा गाजवला. कधी प्रोफेशनल लाईफमुळे, तर कधी वैयक्तिक आयुष्यामुळे नीना गुप्ता नेहमीच चर्चेत राहिल्या. असाच अभिनेत्रींपैकी एक नामांकीत अभिनेत्री म्हणजे, नीना गुप्ता (Neena Gupta). आपल्या प्रोफेशनल लाईफसोबतच पर्सनल लाईफमुळेही चर्चेत होत्या नीना गुप्ता. 

बॉलिवूडची नामांकीत अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नीना गुप्ता आपल्या आगळ्या वेगळ्या भूमिकांसाठी नेहमीच ओळखल्या जातात. त्यांनी आजवर साकारलेल्या प्रत्येक पात्रानं चाहत्यांच्या मनावर खोल छाप सोडली आहे. त्यांचा अभिनय आणि सौंदर्य पाहून सगळेच प्रभावित झाले आहेत. सध्या नीना गुप्ता त्यांच्या आगामी प्रोजेक्टवर काम करत आहेत. याच प्रोजेक्टमधील त्यांचा एक लूक प्रचंड व्हायरल होत आहे. त्यांच्या या लूकच्या चर्चा सगळीकडे पसरल्या आहेत. हा व्हायरल होणारा फोटो म्हणजे, त्यांचा त्यांच्या आगामी प्रोजेक्टमधला लूक असल्याचं सांगितलं जात आहे. व्हायरल होणाऱ्या लूकसाठी नीना गुप्ता यांनी टक्कल केल्याचं पाहायला मिळतंय. तसेच, त्यांच्या संपूर्ण चेहरा हिरवा पडला आहे. तर, त्यांचे डोळे सोनेरी रंगाचे दिसत आहेत. पंचायतमधल्या प्रधानजींच्या पत्नीची भूमिका साकारलेल्या नीना गुप्तांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं. पण, त्यांचा हा लूक पाहून चाहते पुरते हादरुन गेले आहेत. 

View this post on Instagram
 
A post shared by YouTube India (@youtubeindia)

नीना गुप्ता यांचा 'गंजी चुडैल' लूक 

दरम्यान, नुकताच यूट्यूब इंडिया इंस्टाग्राम पेजवर नीना गुप्ता यांचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. जो सध्या खूप वेगानं व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये 65 वर्षीय नीना गुप्ता सोनेरी डोळे, हिरवा चेहरा आणि डोक्यावर टक्कल अशा लूकमध्ये दिसत आहेत. त्याच्या लूकनं युजर्सलाही आश्चर्यचकित झाले आहेत. नीना  गुप्ता यांच्यासोबत ब्युटी आणि लाईफस्टाईल स्टार शिवशक्ती सचदेव, इशिता मंगल आणि शक्ती सिधवानी देखील व्हिडीओमध्ये दिसत आहेत.

View this post on Instagram
 
A post shared by YouTube India (@youtubeindia)

नीना गुप्तांचा 'गंजी चुडैल' लूक पाहून चाहते हैराण 

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओची सुरुवात होते, एका व्हॉईस ओव्हरनं. ज्यामध्ये ऐकू येतं की, एक दिवस तीन युट्युबर्सना गंजी चुड़ैल किडनॅप करते. त्यानंतर नीना गुप्ता यांची दणक्यात एन्ट्री होते. नीना गुप्ता यांच्या डोक्यावर अजिबात केस नाही, चेहरा एकदम हिरवागार आणि डोळे सोनेरी... एन्ट्री करताच नीना गुप्ता म्हणतात, "मी थकलेय मीम्स बनवून. आता तुम्ही तिघं मला बेब बनवणार. अभिनेत्रीच्या या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. तर व्हिडीओवर लाखो कमेंट्स आल्या आहेत. 

नीना गुप्तांचा लूक पाहून युजर्स हादरले 

नीना गुप्ता यांचा भयावह लूक वाहून युजर्स पुरते हादरले आहेत. त्यांनी एक व्हिडीओ शेअर कर क्लासी कॅप्शन दिलं आहे. कॅप्शनमध्ये "भूत आयकॉनिकपासून यूथ आयकॉनिकपर्यंत, ही आहे Gen Z ची चुडैल..." असं लिहिलं आहे. नीना गुप्तांच्या या व्हिडीओवर युजर्स वेगवेगळ्या कमेंट्स करुन व्यक्त होत आहेत. कोणी त्यांना क्युट चुडैल म्हणतंय, तर कुणी डरावनी गंजी डायन असं म्हणतंय. एका युजरनं कमेंट करत लिहिलं आहे की, "अरे प्रधान जी की बीवी का क्या हो गया.." तर आणखी एका युजरनं लिहिलं आहे की, "खरंच प्रधानजींची पत्नी आहे का?".

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Sharmila Tagore Bikini Poster: अख्ख्या मुंबईत लावलेले अभिनेत्रीचे बिकनीतले पोस्टर्स; पण अचानक होणारी सासू भेटायला निघाली अन्...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Praniti Shinde: 'मागच्या रस्त्याने येऊन, evm मॅन्यूपुलेट करून..' पराभवानंतर प्रणिती शिंदेंचा दावा, म्हणाल्या..
'मागच्या रस्त्याने येऊन, evm मॅन्यूपुलेट करून..' पराभवानंतर प्रणिती शिंदेंचा दावा, म्हणाल्या..
IND vs AUS 2nd Test : ॲडलेड कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेइंग-11 फिक्स, 'या' खेळाडूंसोबत रोहित शर्मा उतरणार मैदानात
ॲडलेड कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेइंग-11 फिक्स, 'या' खेळाडूंसोबत रोहित शर्मा उतरणार मैदानात
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  2 डिसेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7 AM : 2 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :2 डिसेंबर 2024 : ABP MajhaDevendra Fadanvis Will Be New CM : 5 तारखेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार- पीटीआय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Praniti Shinde: 'मागच्या रस्त्याने येऊन, evm मॅन्यूपुलेट करून..' पराभवानंतर प्रणिती शिंदेंचा दावा, म्हणाल्या..
'मागच्या रस्त्याने येऊन, evm मॅन्यूपुलेट करून..' पराभवानंतर प्रणिती शिंदेंचा दावा, म्हणाल्या..
IND vs AUS 2nd Test : ॲडलेड कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेइंग-11 फिक्स, 'या' खेळाडूंसोबत रोहित शर्मा उतरणार मैदानात
ॲडलेड कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेइंग-11 फिक्स, 'या' खेळाडूंसोबत रोहित शर्मा उतरणार मैदानात
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
Sanjay Gaikwad : मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
Rohit Sharma : रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
2029 ची विधानसभा जिंकायच्या तयारीला लागा; चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया
2029 ची विधानसभा जिंकायच्या तयारीला लागा; चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया
मोठी बातमी! देशाच्या तिजोरीत मोठी भर, महिनाभरात GST संकलन 1.82 लाख कोटींवर 
मोठी बातमी! देशाच्या तिजोरीत मोठी भर, महिनाभरात GST संकलन 1.82 लाख कोटींवर 
Embed widget