Nawazuddin Siddiqui : सिनेमाच्या शूटिंगदरम्यान नवाजुद्दीन सिद्दीकीचा अपघात; मोठी लाट आली अन् थोडक्यात बचावला अभिनेता
Nawazuddin Siddiqui : श्रीलंकेत एका सिनेमाच्या शूटिंगदरम्यान नवाजुद्दी सिद्दीकीचा अपघात झाला होता. या अपघातात अभिनेता थोडक्यात बचावला होता.
Nawazuddin Siddiqui : बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा जलवा दाखवल्यानंतर नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) आता दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. पण या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान श्रीलंकेत नवाजुद्दीनचा अपघात झाला होता. या अपघातात तो थोडक्यात बचावला होता.
नवाजुद्दीन सिद्दीकी 'सैंधव' (Saindhav) या सिनेमाच्या माध्यमातून दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीत पदार्पण करत आहे. शैलेश कोलानुने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 13 जानेवारी 2024 रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात नवाज खलनायकाची भूमिका साकारणार आहे. या सिनेमासाठी त्याने खास तेलुगू भाषा शिकली आहे. या सिनेमासाठी तो खूप उत्सुक आहे.
मोठी लाट आली अन् थोडक्यात बचावला नवाज
'सैंधव' (Saindhav) सिनेमाच्या शूटिंगदरम्यानचा एक किस्सा शेअर करत नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) म्हणाले,"श्रीलंकेत 'सैंधव'च्या शूटिंगदरम्यान मी थोडक्यात बचावलो आहे. या सिनेमाचं आम्ही समुद्रात शूटिंग करत होतो. त्यावेळी एक मोठी लाट आली आणि मी जहाजात पडलो. समुद्रात पडण्यापासून थोडक्यात बचावलो. महत्त्वाची बात म्हणजे हे दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे. त्यामुळे सिनेमा पाहताना प्रेक्षकांना नक्कीच मजा येईल".
View this post on Instagram
खलनायकाच्या भूमिकेत दिसणार नवाज
'सैंधव' या सिनेमात नवाजुद्दीन सिद्दीकी खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. याबद्दल बोलताना तो म्हणाला,"मी कधीच कोणती भूमिका निवडताना नायक, खलनायक या गोष्टींचा विचार केलेला नाही. स्वत:ला आनंद देतील अशा भूमिका करायला मला नेहमीच आवडतं. अनेकदा नकारात्मक भूमिकांमध्ये जास्त वेगळेपण आणता येतं. शैलेशने माझ्यासाठी अशापद्धतीची भूमिका निवडली आहे".
'सैंधव'बद्दल जाणून घ्या (Saindhav Movie Details)
'सैंधव' या सिनेमात नवाजुद्दीन सिद्दीकीसह वेंकटेश, श्रद्धा श्रीनाथ, रुहानी शर्मा, जिशू सेन गुप्ता, मुकेश ऋषी आणि अंड्रिमा जेरेमिया महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा धमाकेदार टीझर आऊट करण्यात आला होता. निहारीका एंटरटेनमेंटच्या बॅनरअंतर्गत या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. संतोष नारायणनने या सिनेमाला संगीत दिलं आहे. 'सैंधव'सह नवाजुद्दीनचे 'बोले चूडिया', 'नूरानी चेहरा' आणि 'संगीन' हे सिनेमे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
संबंधित बातम्या