Nawazuddin Siddiqui : घटस्फोट प्रकरणावर नवाजुद्दीन सेटलमेन्ट करणार? आलियाचे वकिल म्हणाले,"दोघांचं नातं टिकवण्यासाठी मी..."
Nawazuddin Siddiqui : बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीवर त्याची पत्नी आलियाने अनेक आरोप केले आहेत.
Nawazuddin Siddiqui Divorce : बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) गेल्या काही दिवसांपासून वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. नवाजने त्याची पत्नी आलियावर तर आलियाने नवाजवर अनेक आरोप केले आहेत. दोघेही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. नवाजने आलिया आणि त्याच्या भावावर 100 कोटींचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. आता याप्रकरणी आलियाच्या वकिलांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
आलियाचे वकील रिजवान सिद्दीकी म्हणाले की,"नवाजुद्दीन सिद्दीकीने त्याच्या वकिलांमार्फत मला सेटलमेन्टसाठी विचारलं आहे. आता याबद्दल मी आलियासोबत बोलणार आहे. आलिया आणि नवाजचं नातं टिकवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. दोघांनाही आपल्या मुलांची काळजी आहे. मुलांसाठी, त्यांच्या भविष्यासाठी ते लढत आहेत".
100 कोटींच्या मानहानी प्रकरणी रिजवान म्हणाले,"नवाजुद्दीन सिद्दीकीने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या 100 कोटींच्या मानहानी दाखल्याती प्रत अद्याप आमच्यापर्यंत पोहोचलेली नाही". नवाजची सेटलमेन्टची इच्छा पूर्ण होणार की नाही? नवाजसोबत राहायला आलिया होकार देणार का? याकडे आता चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
नवाजुद्दीनने काय आरोप केले आहेत?
नवाजुद्दीन सिद्दीकीने 100 कोटींच्या मानहानीच्या खटल्यासह शमसुद्दीन आणि आलियावर गंभीर आरोप केले आहेत. त्याने भावावर फसवणुकीचा तर आलियावर पैशांचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे.
View this post on Instagram
आलियाने नवाजुद्दीनवर काय आरोप केले आहेत?
नवाजुद्दीन मुलांना दूर करत असल्याचा आरोप आलियाने केला आहे. तसेच गैरवर्तन, जेवण न देणे, खोलीत बंद करणे, मुलांच्या शिक्षणाचा खर्च न उचलणे अशा अनेक आरोपांचा यात समावेश आहे. आलियाने सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ शेअर करत नवाज कसा वाईट आहे हे नेटकऱ्यांना सांगितलं आहे.
नवाजुद्दीनचा 'हड्डी' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला!
बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी सध्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याचे आणि त्याची पत्नी आलियाचे मतभेद सुरू आहेत. 'गँग ऑफ वासेपूर', 'मंटो' या नवाजच्या सिनेमांना आणि 'सेक्रेड गेम्स' या वेब सीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. अनेक दर्जेदार सिनेमांचा आणि वेबसीरिजचा नवाज भाग आहे. त्याचा 'हड्डी' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
संबंधित बातम्या