Nawazuddin Siddhiqui : नवाजुद्दीन सिद्दीकीने भाऊ आणि पत्नी आलियावर दाखल केला 100 कोटींचा मानहानीचा खटला
Nawazuddin Siddiqui : नवाजुद्दीन सिद्दीकीने भाऊ शमसुद्दीन सिद्दीकी आणि पत्नी आलिया सिद्दीकी विरोधात 100 कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला आहे.
![Nawazuddin Siddhiqui : नवाजुद्दीन सिद्दीकीने भाऊ आणि पत्नी आलियावर दाखल केला 100 कोटींचा मानहानीचा खटला Nawazuddin Siddiqui files Rs 100 crore defamation suit against brother Shamasuddin Siddhiqui and wife Aaliya Siddiqui Nawazuddin Siddhiqui : नवाजुद्दीन सिद्दीकीने भाऊ आणि पत्नी आलियावर दाखल केला 100 कोटींचा मानहानीचा खटला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/26/ded90b315d5f4da3bbd1a0757859b7741679816257663254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Nawazuddin Siddiqui Defamation Case On Brother Ex Wife : नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) हा हिंदी सिनेसृष्टीतील एक दिग्गज अभिनेता आहे. पण सध्या तो सिनेमांसाठी चर्चेत नसून वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. आलियाने (Aaliya Siddiqui) अभिनेत्यावर अनेक आरोप केले आहेत. आता नवाजने भाऊ शमसुद्दीन सिद्दीकी (Shamasuddin Siddhiqui) आणि आलिया सिद्दीकी विरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे.
नवाजुद्दीन सिद्दीकीने भाऊ आणि आलिया विरोधात 100 कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला आहे. आता याप्रकरणी 30 मार्च 2023 रोजी सुनावणी होणार आहे. यासंदर्भात बोलताना नवाज म्हणाला, माझा भाऊ आणि आलियाने सोशल मीडियावर माझं नाव खराब करणाऱ्या पोस्ट शेअर करू नयेत आणि माझ्यावर लावलेले आरोप मागे घ्यावेत. तसेच दोघांनीही माझी माफी मागावी".
नवाजुद्दीनने काय आरोप केले आहेत?
नवाजुद्दीन सिद्दीकीने 100 कोटींच्या मानहानीच्या खटल्यासह शमसुद्दीन आणि आलियावर गंभीर आरोप केले आहेत. त्याने भावावर फसवणुकीचा तर आलियावर पैशांचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. दाखल केलेल्या याचिकेनुसार, नवाजने 2008 मध्ये भावावर विश्वास ठेवत पैशांसंबंधित काही कामे त्याच्याकडे सोपवली होती. त्यावेळी त्याचा भाऊ नोकरी करत नव्हता.
नवाज म्हणाला,"मी कामांमध्ये व्यस्त असल्यामुळे आर्थिक जबाबदारीचं काम भावाकडे सोपावलं होतं. एकदा माझ्या भावाने माझ्या पैशांनी एक पॉपर्टी विकत घेतली. त्यावेळी त्याने मला ती प्रॉपर्टी माझ्या नावावर असल्याचं सांगितलं होतं. पण प्रत्यक्षात मात्र त्याने ती प्रॉपर्टी त्याच्या नावावर केली होती. वेगवेगळ्या ठिकाणी प्रॉपर्टी घेण्यासोबत काही गाड्यादेखील त्याने माझ्या पैशांनी विकत घेतल्या आहेत.
आलियानेदेखील मला फसवलं : नवाज
आलियावर आरोप करत नवाज म्हणाला,"माझ्यासोबत लग्न करण्याआधी आलियाचं लग्न झालं होतं. मला हे कळल्यानंतर मोठा धक्का बसला होता". नवाजने आता भाऊ आणि पत्नीवर 21 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप केला आहे. भाऊ आणि पत्नीच्या आरोपांमुळे 100 कोटींपेक्षा अधिक रुपयांचं नुकसान झालं असल्याचं नवाज म्हणाला.
View this post on Instagram
आलियाने नवाजुद्दीनवर काय आरोप केले आहेत?
नवाजुद्दीन मुलांना दूर करत असल्याचा आरोप आलियाने केला आहे. तसेच गैरवर्तन, जेवण न देणे, खोलीत बंद करणे, मुलांच्या शिक्षणाचा खर्च न उचलणे अशा अनेक आरोपांचा यात समावेश आहे. आता पुन्हा एकदा आलियाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत नवाजुद्दीनवर गंभीर आरोप केले आहेत.
संबंधित बातम्या
Aaliya Siddiqui : आलिया सिद्दीकीच्या अडचणीत वाढ; जवळच्या मैत्रिणीने दाखल केला गुन्हा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)